Home Breaking News त्‍या.. तीन निष्‍पाप बालकांचे जीव वाचले असते…!

त्‍या.. तीन निष्‍पाप बालकांचे जीव वाचले असते…!

● खानपट्टा धारकांचा बेजबाबदारपणा

1994

खानपट्टा धारकांचा बेजबाबदारपणा

Wani News | तालुक्‍यातील वांजरी शिवारात दगडाचे उत्‍खनन केलेल्‍या खाणीत पाणी साचुन तलावाचे स्‍वरुप आले. त्‍यात तीन निष्‍पाप बालकांचा बुडून मृत्‍यू झाल्‍याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. खानपट्टा धारकाने महसुल अधिनियमांकडे डोळेझाक केल्‍यानेच अनर्थ घडला आहे. खाण बंद असो अथवा सुरु त्‍या खाणीच्‍या सभोवताल तारेचे कुंपण केले असते तर त्‍या तीन निष्‍पाप बालकांचे जीव वाचले असते अशा तीव्र प्रतिक्रीया उमटत आहे. A wire fence around the mine would have saved the lives of the three innocent children.

तालुक्‍यातील भुगर्भात मौल्‍यवान खनिज संपत्ती आहे, यामुळे महसुल विभागाने ठिक-ठिकाणी अनेकांना खानपट्टे दिले आहे. गौण खनिजाचे होणारे उत्‍खनन आणि त्‍यावर देखरेख ठेवण्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी खनिकर्म विभागाची आहे. परंतु नियमबाह्य पध्‍दतीने बेजबाबदारपणे वागणारे खानपट्टे धारक संबधीत विभागाला सुध्‍दा जुमानतांना दिसत नाही.

वांजरी शिवारात तीन दगडाच्‍या खाणी आहेत त्‍यातील एक खाण बंदावस्‍थेत आहे तर दोन खाणीतुन दगडाचे उत्‍खनन करण्‍यात येते. ज्‍या खाणीत ही दुर्दैवी घटना घडली ती सुरु असुन अविनाश वरवटकर यांनी चालवायला घेतली आहे. पावसाचे पाणी साचल्‍यामुळे काही कालावधी साठी खाण बंद ठेवण्‍यात आली होती, माञ सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्‍यात आलेली नाही.

कोणतीही खाण बंद असो अथवा सुरु खानपट्टा धारकांने त्‍या खाणीच्‍या सभोवताल तारेचे कुंपण करणे गरजेचे आहे. तर सुरक्षा रक्षकांची नेमणुक करुन खाण प्रतिबंधीत क्षेञात कोणालाही प्रवेश देण्‍यात येवू नये असे नियम आहे. कोणतीही जीवितहानी होणार नाही याकडे गांर्भीर्याने लक्ष देण्‍याची गरज खानपट्टा धारकांने घेणे अभिप्रेत आहे.

अविनाश वरवटकर हे चालवत असलेल्‍या खाणीत सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्‍यात आली नव्हती. खाणीच्‍या सभोवताल तारेचे कुंपण करण्‍यात आलेले नाही. खानपट्टा धारकांच्‍या या बेजबाबदारपणामुळेच त्या तीन निष्‍पाप बालकांचा दुर्दैवी मृत्‍यू झाला आहे. शासन त्या खानपट्टा धारकावर नेमकी काय कारवाई करणार हे बघणे औत्‍सूक्‍याचे आहे.
Rokhthok News