Home Breaking News सिनेतारका प्राजक्‍ता माळी पाडणार तरुणांना “भुरळ”

सिनेतारका प्राजक्‍ता माळी पाडणार तरुणांना “भुरळ”

● Manse Dahihandi : भव्‍यदिव्‍य आयोजन ● अडीच लाखाचे पहिले बक्षीस

1011

Manse Dahihandi : भव्‍यदिव्‍य आयोजन
 अडीच लाखाचे पहिले बक्षीस

Mns News Wani | विदर्भात प्रथमच 41 फुटाचा थरार वणीतील दहिहंडीत अनुभवता येणार आहे. दहा ते पंधरा गोविंदा पथक सोमवारी सकाळी वणीत दाखल होणार आहे. लाखो रुपयांच्‍या बक्षीसाची लयलुट केल्‍या जाणार असुन तरुणांना भुरळ पाडण्‍यासाठी सिनेतारका प्राजक्‍ता माळी प्रामुख्‍याने उपस्थित राहणार आहे. Movie star Prajakta Mali will be prominently present to woo the youth.

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांच्‍या संकल्‍पनेतुन दहिहंडीचे भव्‍यदिव्‍य आयोजन सोमवार दि. 11 सप्‍टेंबरला येथील शासकीय मैदानावर करण्‍यात आले आहे. प्रमुख आकर्षण प्रसिध्‍द सिनेतारका प्राजक्‍ता माळी असणार आहे.

संगीताची धुरा बॉलीवूडचे म्‍युझीक इव्‍हेन्‍ट (Music event) सादरकर्ते संदिप बारस्‍कर हे सांभाळणार आहे. त्‍यांनी अनेक वेळा संगीतकार ए. आर. रहमान यांच्‍या कार्यक्रमांत स्वतः ची म्‍युझिक सिस्टिम (Music system) वापरली आहे. उपस्थित नागरीकांच्‍या संख्‍येवरुन संगीताची लय आणि आवाजाची गती ठेवून दहिहंडीची रंगत वाढवणार आहे.

“ढाक्कुमाक्कुम…टाक्कमाक्कुम..गोविंदा रे गोपाळा ” चा जयघोष आणि गोविंदा पथकाचे थरारक मानवी मनोरे वणीकर नागरीकांना अनुभवता येणार आहे. विजेत्‍या गोविंदा पथकाला प्रथम पारितोषीक दोन लाख 51 हजार, व्दितीय पारितोषीक 1 लाख रुपये तर तृतीय पारितोषीक 51 हजार असणार आहे.

विदर्भात प्रथमच होत असलेल्‍या या भव्‍यदिव्‍य दहिहंडी सोहळ्या करीता महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे विदर्भातील वरिष्‍ठ पदाधिकारी हजेरी लावणार आहे. प्रेक्षकांची संभाव्‍य उपस्थिती लक्षात घेता मनसेच्‍या स्‍थानिक पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केलेली आहे. शासकीय मैदानावर दहिहंडी बघता यावी याकरीता महिलांना बसण्‍याची आसन व्‍यवस्‍था सुध्‍दा करण्‍यात आली आहे.
Rokhthok News

Previous articleCrime…सात जुगारी पोलिसांच्या ताब्यात
Next articleवणीत नॅचरल थेरेपी चिकित्‍सा शिबिर
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.