● अवैद्य दारू विक्रीवर ठेवावा लागेल अंकुश
Wani News | वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 14 व 15 सप्टेंबर ला दारू दुकाने बंद ठेवण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे. पोळा व तान्हा पोळा परिसरात उत्साहात साजरा करण्यात येत असल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 142 (2) अन्वये प्राप्त अधिकारात निर्णय घेतला आहे. An order has been passed to keep liquor shops closed.
पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सि.एल.-3, एफ एल.-3, सी.एल.- 2. एफ. एल. – 2 तसेच बियर शॉपी चे परवाना धारक यांना आदेशीत करत दोन दिवस अनुज्ञप्ती दुकान बंद ठेवण्याचे सुचविण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे.
वणी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व अनुज्ञप्त्या हे दिनांक 14 व 15 सप्टेंबर ला सकाळी 8 ते रात्री 11 वाजता पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास अनुज्ञप्ती धारकावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.
Rokhthok News