● भांदेवाडा येथून फॉर्म भरण्यास सुरवात
MNS Wani News | मतदारसंघातील तरुण- तरुणींना रोजगार मिळावा या करिता मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य रोजगार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 21 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता विदेही सद्गुरु जगन्नाथ महाराज मंदिर भांदेवाडा येथून रोजगार मेळाव्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. MNS leader Raju Umbarkar has taken an ambitious decision to get employment for the youth of the constituency.
तरुण- तरुणींना योग्य मार्गदर्शन आणि संधी न मिळाल्याने शैक्षणिक गुणवत्ता आणि पात्रता असून देखील अपेक्षित क्षेत्रात अनेकांना करिअर घडवता येत नाही. यातच अनेक युवकांना बेरोजगार रहावे लागले असून अनेक युवकांच्या भविष्याचा प्रश्न आपल्यासमोर भेडसावत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारा आयोजित भव्य रोजगार महोत्सवामुळे सुशिक्षित व कुशल तरुण तरुणींना यशस्वी करिअर करण्याची संधी प्राप्त झालेली आहे.
देशातील ५० पेक्षा अधिक आयटी, बँकिंग, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, ॲग्रिकलचर, फायनॅन्स, बीफार्मा-नसिंग, डिलिव्हरी बॉय, सिक्युरिटी गार्ड, लॉजिस्टिक्स, एफएमसीजी, सेवा क्षेत्रातील नामवंत कंपन्या या रोजगार महोत्सवात सहभागी होणार आहे ५००० पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार असून पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र दिले जाणार आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांकरिता संधी उपलब्ध झालेली आहे. विदेही सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज भांदेवाडा येथे नारळ फोडून उद्या दिनांक 21 सप्टेंबर पासून फॉर्म भरण्यास सुरुवात होत आहे.
युवकांना ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार असून उद्या पक्षाच्या वतीने क्यूआर कोड सुद्धा प्रसिद्ध केला जाणार आहे तसेच शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालय नांदेपेरा रोड वणी येथे ऑफलाइन पद्धतीने सुद्धा फॉर्म स्वीकारल्या जाणार असल्याची माहिती मनसे च्या वतीने देण्यात आली आहे.
Rokhthok News