Home वणी परिसर बहुप्रतिक्षीत गाळ्यांचा अखेर होणार ‘लिलाव’

बहुप्रतिक्षीत गाळ्यांचा अखेर होणार ‘लिलाव’

● बाजार समितीची प्रक्रिया पुर्ण

1056

बाजार समितीची प्रक्रिया पुर्ण

Wani News | येथील वरोरा मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्‍या मुख्‍य आवारात बऱ्याच वर्षापुर्वी गाळे बांधण्‍यात आले होते. त्‍या सर्व गाळयांचा लिलाव करण्‍यासाठी हिरवी झेडी मिळाली असुन लिलावाची संपुर्ण प्रक्रिया बाजार समितीने पार पाडली आहे. तरी इच्‍छूकांनी लिजवर गाळा प्राप्‍त करण्‍यासाठी अर्ज करावा असे आवाहन बाजार समितीच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.The market committee has completed the entire process of auctioning.

बाजार समितीच्‍या मुख्य आवाराजवळच वणी-वरोरा मार्गाला लागून गोदाम कम ऑफीसचे बांधकाम करण्यात आलेले आहे. अतिशय मोक्‍याच्‍या ठिकाणी व मार्गाच्‍या लगतच गाळे, कार्यालय व्‍यवसायीकदृष्‍टया फायदेशीर राहणार आहे. बाजार समितीने आर्थिक स्‍ञोत वाढावा याकरीता एकुन 78 गाळयांचे निर्माण केले आहे. गोदाम किंवा कार्यालय याकरीता 29 वर्षे कालावधीसाठी लिज डिड करून देण्‍यात येणार आहे. याकरिता अनामत रक्कम घेऊन व भाडे करारनामा करून दिल्‍या जाणार आहे.

बाजार समितीने सर्वसाधारण सभेत ठराव केला आहे त्‍यान्‍वये महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 व कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) नियम 1967 आदर्श उपविधी, बाजार समिती ठराव, शासनाचे आदेश पत्र आणि अटी व शर्तीनुसार गोदाम कम ऑफिसचा जाहीर लिलाव करणेकरीता अर्ज मागविण्‍यात आले आहे. याकरीता दोन हजार रुपये भरणा करावा लागणार आहे.

अर्ज विहित नमुण्यात भरून अर्जासोबत रुपये दोन लाख चा डिमांड ड्राफ्ट कृषि उत्पन्न बाजार समिती,  वणीचे नावे द्यावा लागणार आहे. सोबतच आधार कार्ड, पॅनकार्ड,   दोन पासपोर्ट फोटो  इत्यादी कागदपत्रे दिनांक 15 ते 30 सप्‍टेंबर या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजता पर्यंत जमा करावे लागणार आहे.

लिलाव प्रक्रियेत दिव्यांगाकरीता तीन टक्के राखीव असल्यामुळे दिव्यांगानी सक्षम प्राधिकारी यांचा दाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. जाहीर लिलावातील बोलीनुसार योग्य अनामतची रक्कम बाजार समितीस प्राप्त न झाल्यास तथा काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास सदर गोदाम कम ऑफिस जाहीर लिलावाचा निर्णय बाजार समितीने राखुन ठेवला आहे.
Rokhthok News