Home Breaking News वेकोली प्रशासन उठले नागरीकांच्‍या जीवांवर…!

वेकोली प्रशासन उठले नागरीकांच्‍या जीवांवर…!

● नायगाव चेकपोस्ट जवळ चक्‍काजाम ● शिवसेना ठाकरे गट आक्रमक

916

नायगाव चेकपोस्ट जवळ चक्‍काजाम
शिवसेना ठाकरे गट आक्रमक

Shivsena News Wani | वेकोली प्रशासनाचा अनागोंदीपणा पुन्‍हा प्रकर्शाने दिसुन येत आहे. अनेकदा निवेदने देऊन सुध्‍दा दखल घेतल्‍या जात नाही. वेकोली प्रशासन नागरीकांच्‍या जीवांवर उठले की काय असा संतप्‍त सवाल उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे उप जिल्‍हाप्रमुख संजय निखाडे यांचे नेतृत्‍वात बेलोरा चेकपोस्ट जवळील राज्य मार्गावर रविवार दिनांक 24 सप्‍टेंबरला चक्‍काजाम आंदोलन करण्‍यात आले. Shiv Sena Thackeray group deputy district chief Sanjay Nikhade led the Chakkajam protest.

c1_20230925_17572726

बेलोरा चेकपोस्ट जवळील राज्य मार्गावर दुतर्फा कोळसा वाहतुक करणाऱ्या अवजड ट्रकची होत असलेली पार्कींग धोकादायक आहे. अपघाताची शक्‍यता कमालीची वाढली आहे. सर्वसामान्‍य वाहनचालकांना मार्गक्रमण करणे दुरापास्‍त झाले आहे. रस्‍त्‍यावरील चिखल, पाणी,  धुळ यांचे साम्राज्‍य प्रदुषणात भर टाकताहेत.

वेकोलीच्‍या पैनगंगा, मुंगोली, कोलगांव, नायगांव,  निलजई येथील कोळसा खाणीतुन उत्‍खनन झालेला कोळसा, हायवा ट्रक मधुन वाहतुक होते. ट्रक चालक वाहनाच्‍या मधील चाके उचलुन चालत असल्‍याने रस्‍त्‍याची ऐसीतैसी होत आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा असणारी शेतजमीन प्रदुषणाने बाधीत झाली आहे.

c1_20230925_17581463

वेकोली प्रशासन व उपविभागीय परिवहन विभाग,  चंद्रपूर तसेच यवतमाळ आणि शासकीय व प्रशासकीय अधिकारी यांच्या संगनमताने रात्रीच्या वेळी ओव्हरलोड कोळसा वाहतूक केली जात असल्‍याचा आरोप निखाडे यांनी केला आहे. वेकोली प्रशासनाच्‍या विरोधात कोणताही अधिकारी ‘ब्र’ काढायला तयार नाही. सर्वसामान्‍य नागरीक माञ भरडल्‍या जात आहे.

उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात वेकोली प्रशासना विरोधात आंदोलन करण्‍यात आले. याप्रसंगी स्‍वतःची स्‍वतंञ पार्किंग व्यवस्था करावी, अवजड वाहनातुन होणारी ओव्‍हरलोड वाहतुक बंद करावी, प्रदुषणाला आळा बसवावा, साखरा ते कोलगांव कॉक्रीटीकरण करावे आणि महामार्गावर गतीरोधक बसवावे अशा स्‍वरुपाच्‍या मागण्‍या रेटून धरण्‍यात आल्‍या आहेत. मागण्‍याच्‍या पुर्ततेचे वेकोली प्रशासनाकडून आश्‍वासन मिळाल्‍यानंतर एक आठवडा आंदोलन स्थगित करण्‍यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलन शिवसेना स्टाईल असेल असे निखाडे यांनी स्पष्ट केले.
Rokhthok News