Home वणी परिसर केशवस्मृती मुख्यालयाचा लोकार्पण सोहळा

केशवस्मृती मुख्यालयाचा लोकार्पण सोहळा

● मान्यवरांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन

296

मान्यवरांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन

Wani News | सहकार क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या पतसंस्थांमध्ये केशव नागरी सहकारी पतसंस्था हे नाव देखील अग्रस्थानी आहे. ठेवीदारांचं आर्थिक हीत संस्थेने जोपासलं यामुळे अल्पावधीत प्रगतीची शिखरे पादाक्रांत करण्यात यश मिळालं आहे. अद्यावत आणि परिपूर्ण केशवस्मृती मुख्यालयाचा लोकार्पण सोहळा बुधवार दिनांक 27 सप्टेंबरला मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. The dedication ceremony of Keshavsmriti headquarters will be held on Wednesday, September 27 in the presence of dignitaries.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख सुनिल देशपांडे यांच्या हस्ते केशवस्मृती या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सहकार भारतीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश महामंत्री विवेक जुगादे हे उपस्थित राहणार आहेत. या लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्षस्थान पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर खोंड हे भूषवणार आहे.

लोकार्पण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारच्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, यवतमाळ विधानसभा क्षेत्राचे आमदार मदन येरावार, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, रा,स्व. संघाचे तालुका संघ चालक बंडू भागवत, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नाना चव्हाण, भाजपचे जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांची उपस्थिती लाभणार आहे.

पतसंस्थेच्या ठेवी आज 92 कोटींच्या जवळपास आहेत. 31 मार्च 2024 पर्यंत पतसंस्थेच्या ठेवी 100 कोटी पर्यंत वाढविण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. या पतसंस्थेची केशवस्मृती ही स्वमालकीची वास्तू तयार झाली असून ही पतसंस्था आपल्या हक्काच्या वास्तूत स्थानांतरित होणार आहे.

संस्थेला प्रगतीपथावर पोहचविण्यासाठी केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. बुधवारी दुपारी चार वाजता “केशवस्मृती” डॉ. तुगनायत यांच्या क्लिनीक समोर, लोकार्पण व उद्घाटन सोहळा होणार असून या मंगल प्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
Rokhthok News