Home Breaking News आता… दुकानांवर झळकणार मराठी पाट्या

आता… दुकानांवर झळकणार मराठी पाट्या

● न्‍यायालायाचा आदेश, मनसेचा जल्‍लोष

782

न्‍यायालायाचा आदेश, मनसेचा जल्‍लोष

MNS NEWS WANI | महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी सातत्‍याने मराठी पाट्या दुकानांवर झळकाव्‍यात याकरीता आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. माञ मुजोर व्‍यवसायीक ऐकायला तयार नव्‍हते. अखेर सर्वोच्‍च न्‍यायालायाने निर्णय देत दोन महिन्‍यांत व्‍यवसायीकांनी दुकानावर मराठी मध्ये पाट्या लावाव्‍यात असे आदेशीत केले. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशांचे महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने स्‍वागत केले असुन मोठा जल्‍लोष करण्‍यात आला आहे. The orders of the Supreme Court have been welcomed by the Maharashtra Navnirman Sena and there has been a huge jubilation.

दसरा दिवाळीपूर्वी दुकानांवर मराठी पाट्या लावून व्यावसायिक उलाढाल वाढविण्याची हीच वेळ आहे, असा सल्ला देत सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापाऱ्यांना दोन महिन्यांत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले. या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र सैनिकांनी मोठा जल्लोष  केला.

मागील वर्षी राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचे आदेश जारी केले होते. त्यास फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने न्यायालयात आव्हान दिले होते. दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात हा आदेश अतार्किक आहे. राज्य सरकार भाषेच्या बाबत दुकानदारांवर मोठ्या आर्थिक भुर्दडाची सक्ती लादू शकत नाही, असा युक्तिवाद याचिकादारांनी केला होता.

या निकालाविरुद्ध व्यापारी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी करताना मराठी पाट्या लावण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी डिसेंबरपर्यंत स्थगित केली. सुप्रीम कोर्टाने व्यापाऱ्यांना मराठी पाट्या लावण्याचा आदेश दिल्याबद्दल राजू उंबरकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करून आभार व्यक्त केले. तसेच सर्व व्यापाऱ्यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्या निर्णयाचे पालन करून सहकार्य करावे असे मत यावेळी व्यक्त केले.

न्‍यायालयाचा निर्णय स्‍वागतार्ह

c1_20230917_12284883
राजसाहेब ठाकरे मागील 17 वर्षे महाराष्ट्रातील दुकानांवरील पाट्या मराठीत असल्या पाहिजेत, यासाठी आक्रमक भूमिका मांडत होते. माझ्यासह अनेक महाराष्ट्र सैनिकांना मराठी पाटी आंदोलनामुळे जेल मध्ये सुद्धा जावे लागले होते. कोर्टाने अखेर हा मुद्दा निकालात काढला आहे. सर्व व्यापाऱ्यांना दोन महिन्यात मराठी पाट्या लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबद्दल सुप्रीम कोर्टाचे आभार व्यक्त करतो.
राजू उंबरकर
नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
ROKHTHOK NEWS