Home Breaking News एकमेकांना मारहाण, सोळा तरुणांवर गुन्हा

एकमेकांना मारहाण, सोळा तरुणांवर गुन्हा

● सोने व रोकड लंपास केल्याचा आरोप

2485

सोने व रोकड लंपास केल्याचा आरोप

Wani News | उज्वल गौ रक्षण गंगाविहार समोर क्षुल्लक कारणावरून दोन गटात वाद झाले. एकमेकांना मारहाण करण्यात आली तर सोने व रोकड लंपास केल्याचा आरोप करत पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी करण्यात आल्या. या प्रकरणी दोन्ही गटातील 16 तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. A case has been registered against 16 youths from both the groups.

गुरुवारी रात्री बस स्थानक परिसरात गायीचे वासरू मृतावस्थेत आढळले. ही बाब श्रीराम गौरक्षण ट्रस्टचे अध्यक्ष नरेश हेमंतराव निकम (40) रा. वसंत गंगाविहार यांना समजली. त्यांनी त्या मृत वासरावर उज्वल गौरक्षन गंगाविहार मध्ये अंत्यसंस्कार केले.

अंतविधी करुन परत येत असतांना गौरक्षण च्या बाहेर अभि नागपुरे रा. वाल्मिकी नगर यांनी संतोष लक्षट्टीवार व विशाल दुधबळे सह अन्य तरुणांना बोलावून जबर मारहाण केली आणि ऐवज व रोकड लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.

याच घटनेत संतोष तुलशिदास लक्षट्टीवार (28) राहणार इंदिरा चौक याने पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीत नमूद केले की, अभि नागपुरे यांनी फोन करून बोलावल्यामुळे उज्वल गौरक्षन गंगाविहार येथे आम्ही बजरंग दलाचे कार्यकर्ते पोहचलो. त्यावेळी तेथे नरेश निकम, पवन उरकुडे, पवन बु-हाण व श्रीराम आरतीचे 10 लोक तेथे उपस्थित होते. त्यांनी शिवीगाळ केली यामुळे वादावादी झाली आणि वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले.

दोन्ही गटाने परस्परविरोधी तक्रारी पोलिसात नोंदवल्या असून निकम यांच्या तक्रारीवरून अभी नागपुरे, संतोष लक्षट्टीवार, विशाल दुधबळे व अन्य पाच तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर लक्षट्टीवार याचे तक्रारीवरून नरेश निकम, पवन उरकुडे, पवन बु-हाण व अन्य पाच तरुण असे एकूण 16 जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास वणी पोलीस करताहेत.
Rokhthok News