Home Breaking News अनर्थ टळला..सिमेंटचा टँकर महामार्गावर पलटला

अनर्थ टळला..सिमेंटचा टँकर महामार्गावर पलटला

● सुदैवानं जीवितहानी टळली

590

सुदैवानं जीवितहानी टळली

Accident News Wani | वणी शहरालगतच्या महामार्गावर अपघाताची शृंखला सुरू झाली आहे. बेदरकार वाहनचालक आणि विस्कळीत वाहतूक याला जबाबदार आहेत. मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबरला रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान घडली यात सुदैवानं जीवितहानी टळली. A tanker hit a divider and overturned on the highway in Lalpulia area, fortunately a disaster was avoided.

चंद्रपूर येथून लिक्विड सिमेंट घेऊन रस्ते बांधकाम होत असलेल्या जिल्ह्यात सिमेंट घेऊन टँकर जात होता. टँकर क्रमांक MH-34-BG-4309 चंद्रपूर वरून रात्री वणीत पोहचला. रात्री टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर डिव्हायडरला धडकला.

या अपघातात वर्दळीच्या महामार्गावर महाकाय टँकर पलटी झाल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. मात्र त्याच वेळी वर्दळ अल्प होती, आणि अनर्थ टळला. या घटनेत कोणालाही इजा पोहचली नाही. पोलिसांनी घटना घडतात थेट घटनास्थळ गाठले. पुढील तपास सुरू आहे.
Rokhthok News

Previous articleसुधाकर डाहूले यांचे निधन
Next articleथरारक…..शेतात वाघ…शेतकरी झाडावर
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.