Home Breaking News MNS political : मनसेचा ढाण्या वाघ लोकसभेच्‍या “आखाड्यात”…!

MNS political : मनसेचा ढाण्या वाघ लोकसभेच्‍या “आखाड्यात”…!

● राजु उंबरकर यांचा संभाव्‍य यादीत समावेश

1477

राजु उंबरकर यांचा संभाव्‍य यादीत समावेश

MNS NEWS WANI | लोकसभेचे वारे वाहायला लागले आहेत, बहुतांश राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करतांना दिसत आहे. चंद्रपुर-वणी-आर्णी या लोकसभा मतदारसंघात महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेकडून तरुण तडफदार युवा मनसे नेते राजु उंबरकर यांचे नांव संभाव्‍य यादीत झळकल्‍याने महाराष्‍ट्र सैनिकांत उत्‍साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. From Maharashtra Navnirman Sena, the name of young ambitious youth MNS leader Raju Umbarkar is in the probable list.

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या स्‍थापनेपासुन पक्षात खंबीरपणे कार्यरत असणारे व संघटनात्‍मक बांधणी मजबुत करणारे उंबरकर यांच्‍या एकनिष्‍ठतेचे फळ पक्षाने दिले. विदर्भात प्रथमच नेतेपदाचा बहुमान उंबरकरांना मिळाला आहे. लोकसभा क्षेञातच नव्‍हे तर संपुर्ण विदर्भात मनसेचा झंझावात त्‍यांनी निर्माण केला आहे. यामुळेच त्‍यांना मनसेचे लोकसभा उमेदवार म्‍हणुन संभाव्‍य यादीत स्‍थान मिळाल्‍याचे बोलल्‍या जात आहे.

मनसे नेते उंबरकर यांनी पक्षाची संघटनात्‍मक बांधणी अतीशय नियोजनबध्‍द पध्‍दतीने केलेली आहे. तरुण युवकांची फौज त्‍यांनी तयार केली असुन सदोदीत सर्वसमावेशक, जनहितार्थ आंदोलनामुळे ते सातत्‍याने चर्चेत असतात. अडल्‍या नडल्‍यांसाठी कोणत्‍याही क्षणी धावून जाण्‍याची त्‍यांची वृत्‍ती, आपत्‍तीत सर्वप्रथम मदतीसाठी पोहचणारे राजकीय व्‍यक्‍तीमत्‍व म्‍हणुन त्‍यांना ओळखल्‍या जाते.

चंद्रपुर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा येतात. चंद्रपुर, राजुरा, भद्रावती- वरोरा,  बल्‍लारशहा, वणी व आर्णी हे मतदारसंघ आहेत. सहापैकी तीन भाजपा, दोन कॉग्रेस व एक अपक्ष असे आमदार मागील निवडणुकीत निवडून आले आहेत. तर लोकसभेत भाजपाला पराभुत करत राज्‍यात कॉग्रेसचे एकमेव खा. बाळु धानोरकर यांनी विजय मिळवला होता माञ अल्‍पशा आजाराने त्‍यांचे निधन झाले आहे.

पक्षाने दिलेला आदेश शिरसावंद्य

c1_20230917_12284883
चंद्रपुर आर्णी लोकसभा मतदारसंघाने मागील निवडणुकीत राज्‍यात करिष्‍मा करत एकमेव कॉग्रेस उमेदवाराला विजयी केले होते. मतदारसंघातील मतदार सुज्ञ आहेत, आता महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना हा मतदारसंघ काबीज करेल असे राजु उंबरकरांनी स्‍पष्‍ट केले आहे. पक्षाने आजपर्यंत दिलेले आदेश पुर्णत्‍वास नेण्‍याचा प्रामाणीक प्रयत्‍न केला आहे. यापुढे सुध्‍दा पक्षाने दिलेला आदेश शिरसावंद्य असे मत उंबरकरांनी व्‍यक्‍त केले.

Previous articleMNS aggressive… वेकोली प्रशासन नमले
Next articleरेणुका मातेची अखंड ज्योत दुर्गामाता मंदिरात
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.