Home Breaking News औषधांचा तुटवडा, रुग्णांची हेळसांड, आरोग्यसेवा ढेपाळली

औषधांचा तुटवडा, रुग्णांची हेळसांड, आरोग्यसेवा ढेपाळली

● शिवसेना आक्रमक, तात्काळ सोयीसुविधा द्या

600
C1 20231013 18101332
शिवसेना आक्रमक, तात्काळ सोयीसुविधा द्या

Shivsena(UBT) News Wani | राज्यात आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा उडाला असून मृत्यूचे तांडव सुरू आहे. शासन, लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात सुद्धा विदारक स्थिती आहे. गुरुवारी शिवसेना (उबाठा) चे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे व शहर प्रमुख सुधीर थेरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी रुग्णालयाची पाहणी केली असता औषधाचा तुटवडा, कर्मचाऱ्यांची वानवा, सोयीसुविधेचा अभाव व प्रचंड दुरवस्था आढळून आली. When the hospital was inspected, shortage of medicine, lack of staff, lack of facilities and very poor condition were found.

C1 20231013 18092206

ग्रामीण रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कार्यान्वित नाही. ओपीडी मध्ये रुग्णांची थातुरमातुर तपासणी केल्या जाते. गंभीर रुग्णांवर प्राथमीक उपचार न करता रुग्णाला दुसरीकडे हलविण्यात येते. सध्यस्थीतीत सर्वत्र व्हायरल आजाराने धुमाकूळ घातला आहे. असं असताना ग्रामीण रुग्णालयात रुग्णासाठी योग्य सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णामध्ये रोष निर्माण होत आहे.

ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटरची निर्मिती करण्यात आलेली आहे मात्र ती वास्तू केवळ धूळ खात आहे. शासनाचे करोडो रुपये पाण्यात गेल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. ग्रामीण रुग्णालयात एकूण मंजूर पदे 29 असताना फक्त 17 पदे भरण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे डॉक्टरांची 4 पदे रिक्त आहे. ऑपरेशन थिएटर ची गरज आहे, लॅबोरेटरी असिस्टंट हे पद अद्याप भरलेले नाही. ऑर्थो व अनथेसिस्ट डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नाहीत.

उपविभागातील औद्योगिकीकरण व होत असलेले प्रदूषण यामुळे विविध आजाराने थैमान घातले आहे. स्थानिक नागरिकांना अनेक आरोग्यविषयक समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यातच खनिज संपत्तीचे बेजबाबदारपणे अवजड वाहनातून होणारे दळणवळण अपघाताला कारणीभूत ठरताहेत. यामुळे ग्रामीण रुग्णालयाची संपूर्ण प्रणाली अपुरी पडताना दिसत आहे.

वणी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाची होत असलेली कुचंबणा शासनाने तात्काळ थांबवावी. तसेच रुग्णाला अपेक्षित सोयीसुविधा पुरवाव्या तसे न झाल्यास शिवसेना ( उबाठा ) सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन जनहीतार्थ तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी उप शहर प्रमुख प्रशांत बलकी, अजय चन्ने, अजिंक्य शेंडे, स्वप्नील ताजने, धर्मा काकडे व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Rokhthok News