Home Breaking News मनसे दांडीया, लाखोंच्या बक्षिसांची लयलूट

मनसे दांडीया, लाखोंच्या बक्षिसांची लयलूट

★ मनसे नेते राजु उंबरकर यांचे आयोजन

851
C1 20231017 07381772

मनसे नेते राजु उंबरकर यांचे आयोजन

MNS Dandiya News | देशभरात नवरात्रोत्सवाच्या उत्सवाला सुरुवात झाली. नऊ दिवस आदिशक्तीचा जागर करत मोठया प्रमाणात सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांच्या कडून भव्य दांडिया गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी लाखोंच्या बक्षिसांची लयलूट करण्यात येणार आहे. Maharashtra Navnirman Sena leader Raju Umbarkar has organized a grand Dandiya Garba festival.

C1 20231017 07400159

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून शहरातील युवा व महिलांसाठी गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून या गरबाचे प्रशिक्षण कार्यशाळा शहरातील विराणी फंक्शन हॉल येथे चालू करण्यात आली होती. यात शहरातील हजारों महिलांनी व युवानी सहभाग नोंदविला होता.

C1 20231017 07390322

घटस्थापनेच्या मुहूर्तावर दांडिया गरबा स्पर्धेची सुरूवात करण्यात आली. शहरातील राम शेवाळकर परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलिस निरीक्षक अजित जाधव, मनसे नेते राजु उंबरकर, इर्शाद खान, संतोष जयस्वाल, शैलेश तोटावार, अनिस सलाट यांच्या उपस्थितीत या भव्य दांडिया गरब्याचे उद्घाटन पार पडले.

C1 20231017 07403712

स्पर्धेत उत्कृष्ट नृत्य, वेशभूषा व देहबोली यांवर आधारित 20 स्पर्धकांना दररोज सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. उत्कृष्ट नृत्य प्रदर्शनास पन्नास टक्के दरात एक ड्रायव्हिंग लायसन्स काढून देण्यात येईल. येईल.संपुर्ण स्पर्धकांतून 9 मुख्य विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे या स्पर्धेत दिली जाणार आहे.

● प्रथम विजेत्यास : ई – बाईक
● द्वितीय बक्षीस : लॅपटॉप
● तृतीय बक्षीस : चांदीची समई
● चतुर्थ बक्षीस : सोन्याची नथ
● पाचवे बक्षीस : गेअरची सायकल
● सहावे बक्षीस : पैठणी साडी
● सातवे बक्षीस : मोबाईल फोन
● आठवे बक्षीस : शॉकअपची सायकल
● नववे बक्षीस : पैठणी साडी

उद्घाटन प्रसंगी मनसेचे धनंजय त्रिंबके, फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे, महीला जिल्हाध्यक्ष अर्चना बोधाडरकर, प्रिया लभाणे, रोहिणी उंबरकर, तृप्ती उंबरकर, एकता पेचे, आजिद शेख, शम्स सिद्दीकी, सय्यद इनुस, आयाज खान, आकाश दूधबले, धनराज येसेकर, यांच्या सह आयोजन समितीचे लक्की सोमकुंवर, जतिन राऊत, वैभव पुरानकर शुभम पिंपळकर, गौरव पुरानकर, हिमांशू बोहरा, हरीश कामारकर, संस्कार तेलतुंबडे, गौरव गायकवाड यांच्यासह मनसेचे संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Rokhthok News