Home Breaking News Manse dandiya | तुफान, बेधुंद आणि जल्लोष

Manse dandiya | तुफान, बेधुंद आणि जल्लोष

● मनसे नेते राजू उंबरकर यांचे आयोजन

1229
C1 20231021 21394904

मनसे नेते राजू उंबरकर यांचे आयोजन

MNS DANDIYA | नवराञोत्‍सवात गरबा दांडीयाच्‍या माध्‍यमातुन तरुण तरुणींचा उत्‍साह व्दिगुणित व्‍हावा याकरीता मागील दोन वर्षापासुन मनसे नेते राजु उंबरकर यांनी मनसे गरबा महोत्सवाचे आयोजन केले आहेत. तुफान, बेधुंद आणि जल्लोष बघायला मिळतो. लयबद्ध संगिताच्‍या तालावर तरुण-तरुणी बेधुदपणे गरबा नृत्य सादर करताहेत तर अष्टमीला सिने तारका जय मल्हार फेम इशा केसकर वणीत अवतरणार आहे.  Ashtami cine star Isha Keskar of Jai Malhar fame will appear in Wani.

देशभर गरबा खेळला जात असला तरीही नवरात्रोत्सवात गरबा खेळण्याला पारंपरिक महत्त्व आहे. शहरी भागात स्पीकरवर गाणी लावून गरबा खेळला जातो. गरब्याला नृत्याप्रमाणे सादर केले जात असल्याने काही ठिकाणी गरब्याच्या स्टेप्स बदललेल्या पाहायला मिळतात. परंतु, मुळ गरबा प्रकारात नर्तक तीन टाळ्या वाजतात. या तीन टाळ्या म्हणजे त्रिदेवाला नमन करणे होय. पहिली टाळी ब्रम्हदेवाला, दुसरी टाळी भगवान विष्णुला आणि तिसरी टाळी महादेवाचं प्रतिक असल्याचं मानलं जातं.

“मनसे गरबा महोत्सवास” शहरातील तरुण तरुणी व महिलांची मोठ्या प्रमाणात हजेरी असून प्रेक्षकांचा सुद्धा तुफान प्रतिसाद मिळत आहे. लयबद्ध संगिताच्‍या तालावर तरुण-तरुणी बेधुदपणे गरबा नृत्‍यांत सहभागी होताहेत. गरबानृत्‍य बघण्‍यासाठी राम शेवाळकर परिसरातील मनसे गरबा महोत्‍सवात प्रचंड गर्दी उसळत आहे.

नवराञोस्‍तवात आयोजित केलेल्या गरबा महोत्सवामध्‍ये जय मल्हार, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेसह नुकताच प्रदर्शित झालेला “सरला एक कोटी” या चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली इशा केसकर रविवार दिनांक 22 ऑक्‍टोबरला सायंकाळी 7 वाजता हजेरी लावणार आहे. यामुळे मनसेच्या गरबा महोत्सवाची रंगत वाढवणार आहे.
Rokhthok News