● शासकीय मैदानावर करण्यात आले आयोजन
Wani News | विनोदातून प्रबोधन हा निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचा गाभा आहे. मनोरंजनात्मक, परखड किर्तनामुळे ते प्रसिध्दीच्या झोतात आले आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने इंदुरीकर महाराज यांच्या धमाल किर्तनाचे आयोजन 3 नोव्हेंबरला येथील शासकीय मैदानावर करण्यात आले आहे. Indurikar Maharaj’s kirtan means bursts of laughter.
इंदुरीकर महाराज यांचे किर्तन म्हणजे लोटपोट हास्यांचे फवारेच असतात. महिलां, विद्यार्थी तर अबाल वृध्दांपर्यत किर्तनातुन मारण्यात येणारे प्रबोधनात्मक फटकारे त्यांच्या किर्तनाचे वैशिष्ट्य आहे. गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी आणि रेणुका ईरीगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टीकाराम कोंगरे यांच्या पुढाकाराने जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदुरी हे महाराजांचे मूळ गाव. आई-वडील वारकरी असल्याने त्यांना घरातूनच संप्रदायाचे बाळकडू मिळाले. बी. एस्सी. बी. एड. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेऊन कीर्तनकार म्हणून पेशा स्वीकारला.
मनोरंजनाकडे अधिक झुकणाऱ्या त्यांच्या कीर्तनाला ग्रामीण भागाने पसंती दिली आहे. त्यांचे कीर्तन म्हणजे गर्दी, हे जणू समीकरणच होऊन गेले आहे. वाहिन्या तसेच सोशल मीडियातून मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्यांचे वलय वाढत गेले. गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांची कीर्तने यू- ट्यूबवर चांगलीच धमाल माजवताहेत.
इंदुरीकर महाराज यांचे धमाल किर्तन 3 नोव्हेंबर ला दुपारी 3 ते 7 या वेळेत शासकीय मैदान (पाण्याची टाकी) येथे होणार आहे. या मनोरंजनात्मक किर्तनाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Rokhthok News