Home Breaking News WCL अधिकाऱ्यांच्या कार्यालया लगतच ‘चोरी’

WCL अधिकाऱ्यांच्या कार्यालया लगतच ‘चोरी’

● शिरपुर पोलीसात गुन्‍हा नोंद

1526
C1 20231110 13290089

शिरपुर पोलीसात गुन्‍हा नोंद

WCL NEWS WANI | उकणी कोळसा खाणीत सब एरीया मॅनेजरच्‍या कार्यालयाजवळील वर्कशॉप मध्‍ये चोरट्यांने चोरी केल्‍याची घटना उघडकीस आली. प्रतिबंधीत क्षेञात चोरटे शिरलेच कसे हा संशोधनाचा विषय असला तरी अज्ञात चोरट्या विरूध्‍द शिरपुर पोलीसात दिनांक 9 नोव्‍हेंबरला गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. An incident of theft by thieves in the workshop was revealed.

वणी उप विभागात मोठया प्रमाणात कोळसा खाणी आहेत. कोळसा चोरी ही बाब आता नविन राहीलेली नाही. त्‍यातच चोरटे आता चक्‍क ट्रान्‍सफार्मर मधील ताब्‍यांच्‍या तारेवर हात साफ करतांना दिसत आहे. उकणी कोळसा खाणीत अधिकाऱ्यांच्या कार्यालयालगत असलेल्‍या वर्कशॉप मधून 30 ते 40 किलो तांब्‍याची तार लंपास करण्‍यात आली आहे.

उकणी खदाणीत सब एरीया मॅनेजर यांच्‍या कार्यालयाला लागुनच वर्कशॉप आहे. येथील वेल्डींग मशीन सेक्शन मधील 3.3KV/220V.63KVA मधील ट्रॉन्सफार्मर दिनांक 5 नोव्‍हेंबरच्‍या राञी फोडण्‍यात आले. त्‍यातील तांब्‍याची तार चोरटयांने लांबवली माञ प्रतिबंधित क्षेत्रात चोरटा शिरलाच कसा हा संशोधनाचा विषय आहे.

उकणी येथील गार्ड इंचार्ज गयाप्रसाद रामप्रसाद केवट हे दिनांक 6 नोव्‍हेंबरला सकाळी 8 वाजता कर्तव्‍यावर गेले असता त्‍यांना ट्रान्‍सफार्मच फोडून तार चोरीला गेल्‍याचे कळले. त्‍यांनी याबाबत वरिष्‍ठांना चोरी बाबतची माहीती दिली. सुरक्षा पथकाने आजुबाजुचे ठिकाणी पाहणी केली असता ट्रॉन्सफार्मर मधील तांब्याची तार मिळुन आली नाही.

प्रतिबंधीत क्षेञात चोरटयांनी शिरकाव केल्‍याने वेकोली प्रशासनाची सुरक्षा व्‍यवस्‍था किती ढिसाळ आहे याची कल्‍पना येते. या प्रकरणी गार्ड इंचार्ज केवट यांच्‍या तक्रारीवरुन शिरपुर पोलीसात अज्ञात चोरट्या विरुध्‍द गुन्‍हा नोंदविण्‍यात आला असुन पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News