● 387 रुग्णांची करण्यात आली तपासणी
Wani News | येथील भारतीय जनता पक्षाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया सातत्याने नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करताहेत. राजेश्वर शिव मंदिर मुकुटबन येथे आयोजित मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप कार्यक्रमात 387 रुग्णांची तपासणी करण्यात आली तर 38 रुग्णांना मोतीयाबिंदू शस्त्रक्रियेसाठी कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे रवाना करण्यात आले. Bharatiya Janata Party leader and social activist Vijaybabu Chordia regularly organizes eye treatment camps here.
मागील काही महिन्यांपासून शहर व ग्रामीण भागातील गरीब नागरिकांसाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती व विजयबाबू चोरडिया यांच्या माध्यमातून नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आज पर्यंत शेकडो रुग्णांवर मोतीयाबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे तर हजारो रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले.
विजयबाबू चोरडिया हे स्वतः शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जावून भेट घेतात तसेच त्यांचेवर व्यवस्थित उपचार होतो की नाही याची माहिती घेताहेत. मुकूटबन येथे पार पडलेल्या शिबिरातील रुग्णांना पुढील महिन्यात चष्मे वाटप करण्यात येणार आहे. रुग्णसेवा हे आद्य कर्तव्य असल्याचे चोरडिया यांनी स्पष्ट केले आहे.
Rokhthok News