Home Breaking News सुवर्णसंधी : हजारों युवकांना रोजगाराची संधी

सुवर्णसंधी : हजारों युवकांना रोजगाराची संधी

● मनसेचा रोजगार महोत्सव 3 डिसेंबरला ● सहभागी व्हा, मनसे नेते राजू उंबरकर यांचे आवाहन

549
C1 20231202 12040487

मनसेचा रोजगार महोत्सव 3 डिसेंबरला
सहभागी व्हा, मनसे नेते राजू उंबरकर यांचे आवाहन

MNS NEWS WANI : वणी विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षीत आणि कुशल युवक – युवतींना यशस्वी करिअरची संधी मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून 3 डिसेंबरला भव्य रोजगार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सुवर्णसंधी चा लाभ घ्यावा असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. A grand employment festival has been organized on December 3 with the concept of Maharashtra Navnirman Sena leader Raju Umbarkar.

विपुल खनिज संपत्तीने नटलेला भाग असलेल्या वणी मतदारसंघात 18 पेक्षा जास्त कोळसा खाणी आहेत. तर त्यावर आधारित अनेक कंपन्या व उद्योग आहेत. तरी सुद्धा अनेक सुशिक्षीत युवा रोजगारा पासुन वंचित आहे. रोजगार नसल्याच्या नैराश्यातून अनेक आत्महत्या झाल्याच्या घटना घडल्या. या समस्येवर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने मनसे नेते उंबरकर यांच्या संकल्पनेतून मनसे रोजगार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

रोजगार महोत्सवात देशातील 70 पेक्षा अधिक उद्योग, सेवा आणि खाजगी क्षेत्रातील नामवंत कंपन्या सहभागी होणार आहे. दिनांक 3 डिसेंबरला सकाळी 8 वाजता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय, वणी (SPM शाळा) येथे वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. यावेळी अर्जदारांची सहभागी कंपन्यांकडून मुलाखत घेतल्या जाणार आहे.

रोजगार महोत्सवात प्रत्येक युवकाला नोकरीची सुवर्णसंधी असून आतापर्यंत ज्या सुशिक्षित बेरोजगारांनी आपले अर्ज भरले नसतील त्यांनी या ठिकाणीही अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर रोजगार मेळावा संपूर्ण जिल्ह्यात सुद्धा आयोजित करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांकरिता संधी उपलब्ध झालेली असून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी केले आहे.
Rokhthok News

Previous articleCrime News : कोंबड बाजार, सहा ताब्यात
Next articleदुःखद : राजू उत्तमराव पाटील यांचे निधन
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.