Home Breaking News शिवालयात दानपेटीवर चोरट्यांचा ‘डल्ला’

शिवालयात दानपेटीवर चोरट्यांचा ‘डल्ला’

● तिसऱ्या डोळ्यात चोरटे कैद

2551
C1 20231207 15222939

तिसऱ्या डोळ्यात चोरटे कैद

Wani News | तालुक्यातील शिरपूर येथील कैलास शिखर वरील शिवालयात चोरट्यानी चक्क दानपेटीवर डल्ला मारला. बुधवार दिनांक सहा डिसेंबरला दुपारी ही घटना घडली असून चोरटे तिसऱ्या डोळ्यात कैद झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. In the temple, the thieves attacked the donation box.

भुरटे चोर कधी कुठे हातसफाई करेल याचा नेम नाही. बुधवारी दुपारी पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे कैलास शिखर मंदिरात भक्ताचे आवागमन नव्हते. याच संधीचा फायदा घेत दोन चोरट्याने शिवालयात प्रवेश केला. मंदिरात ठेवून असलेली दानपेटी फोडली व त्यातील रक्कम लंपास केली.

मंदिरातील दानपेटी फोडल्याचे गुरुवारी सकाळी पुजाऱ्याच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब मंदिर समितीच्या सदस्यांना सांगितली. याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोन संशयित चोरटे दिसून आले. या घटनेत नेमकी किती रक्कम चोरीला गेली हे स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Rokhthok News

Previous articleसाई ट्रॅव्हल्स मधून प्रवाशांची बॅग ‘लंपास’
Next articleRCCPL जपताहेत सामाजीक दायित्व
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.