● शांततेच्या मार्गाने आपला रोष व्यक्त करा
● आ.गोपीचंद पडळकर यांचे आवाहन
Gopichand Padalkar News : धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी सोमवार दिनांक 11 डिसेंबरला नागपुर येथे हिवाळी अधिवेशनावर भव्य इशारा मोर्चा धडकणार आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहून आपला रोष शांततेच्या मार्गाने व्यक्त करावा असे आवाहन आ. गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. On Monday, December 11, a ‘Ishara Morcha’ will be held in Nagpur on the winter session.
दोन दिवसांपुर्वी आ. गोपीचंद पडळकर इंदापुर येथे एका आंदोलनाला जात असतांना अनुचित प्रकार घडला. यावर बोलतांना पडळकर यांनी विरोधकांचा चांगलाच खरपुस समाचार घेतला. काही भेकडांनी मिडीयात नौटंकीबाजी करत मुलाखती दिल्या आणि फुशारक्या मारल्या. याची कीव येत असल्याचे स्पष्ट करत त्यांनी गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असे ठणकावुन सांगीतले.
ओबीसी समाज अत्यंत सयंमाने शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामंधे आपली स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडतोय. परंतु मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेले काही समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे असल्याचे पडळकरांनी सांगीतले.
मराठा समाजाच्या आरक्षणाचाही खरा शत्रू कोण आहे हे सगळ्यांना माहितेय, असे मत व्यक्त करत समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते असे पडळकर म्हणाले. परंतु आज मी माझ्या ओबीसी बांधवांना हेच आवाहन करतो की, आपण या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये, राज्यात शांतता ठेवावी. आणि हिवाळी अधिवेशनावर धडकणाऱ्या इशारा मोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुध्दा त्यांनी केले.
Rokhthok News