● स्वर्णलीला स्कूलचे आयोजन
Wani News :- विध्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा त्यांना गणित विषयाची आवड निर्माण व्हावी या करिता गणित दिवसाचे औचित्य साधून येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल मध्ये रविवार दि 17 डिसेंबरला अल्फोर्स गणित ऑलिम्पियाड परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. On December 17 Alfors Maths Olympiad exam is organized.
थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती संपूर्ण भारतात राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरी केली जाते. या दिनाचे औचित्य साधून अल्फोर्स ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिटयुट तेलंगणा आणि महाराष्ट्र द्वारा संचालित स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल मध्ये AMOT-2024 परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजित स्पर्धा दि. 17 डिसेंबर रविवारला स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल मध्ये होणार आहे. या स्पर्धेत वर्ग 6 ते 10 वी च्या स्टेट बोर्ड, सी बी एस ई, आय. सी एस. ई. मध्ये शिकणाऱ्या वणी परिसरातील सर्व विद्याथ्यर्थ्यांना निःशुल्क प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या दिवशी सकाळी 9 वाजतापासून नोंदणी करता येईल व प्रत्यक्ष परीक्षेचा कालावधी सकाळी 10 ते 11 एक तासाचा असणार आहे.
या स्पर्धेत 50 वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातील. या स्पर्धेत सर्व स्पर्धकांमधून प्रथम तीन विजेत्यांना रोख रकमेच्या स्वरुपात तर प्रत्येक वर्गानुसार प्रथम 20 स्पर्धकांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येईल तसेच प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल व स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.तरी परिसरातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Rokhthok News