Home Breaking News बापरे…. उभ्या दुचाकीला हायवा ट्रकने उडवले

बापरे…. उभ्या दुचाकीला हायवा ट्रकने उडवले

● उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

2082
C1 20231221 17464536
Img 20241016 Wa0023

उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

Accident News : तालुक्यातील मोहदा येथे दिनांक 14 डिसेंबरला चक्क हायवा ट्रकने उभ्या दुचाकीला उडवले. यात गंभीर जखमी झालेल्या 25 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकांवर गुन्हा नोंद केला आहे. The 25-year-old died during treatment.

तालुक्यातील मोहदा या गावात गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची प्रचंड दादागिरी सुरू आहे. निष्पाप जीव जात असताना प्रादेशिक परिवहन विभाग मूग गिळून गप्प आहेत. अनेक गिट्टी खदानी व शेकडो अवजड वाहनांच्या माध्यमातून होणारी वाहतूक स्थानिकांच्या जीवावर बेततांना दिसत आहे.

प्रवीण संजय पिदूरकर (25) असे उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी मोहदा स्मशानभूमी जवळ तो रस्त्याच्या कडेला दुचाकीवर बसून होता. त्याचवेळी भरधाव येत असलेल्या ट्रक क्रमांक MH- 34-BG-1213 याने जबर धडक दिली.

या घटनेत दुचाकीवर बसलेला युवक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून फिर्यादी मनोहर गोवारदीपे यांनी शिरपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी ट्रक चालक रामचंद्र तुळशीराम नैताम (36) राहणार कुंद्रा याचेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Rokhthok News

Previous articleघरातच गळफास लावून संपवले जीवन
Next articleविषाचा घोट : 38 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.