● पोलिसांची कारवाई, बातमी गुलदस्त्यात
● 36 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात
Wani News : ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रक- हायवा अवजड वाहनात वापरण्यासाठी चक्क बनावट डिझेल सदृष्य पदार्थ वापरत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 18 डिसेंबरला हिलटॉप हायराईन कंपनी कोलारपिंपरी येथून अंदाजे तीस हजार लिटर बनावट डिझेल सदृष्य पदार्थ असलेल्या टँकरला ताब्यात घेतले. विस्तृत तपासणीअंती पुरवठादार कंपनी व चालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.Hilltop Highrine Company seized a tanker containing approximately 30,000 liters of fake diesel-like substance from Kolarpimpri.
पोलीस प्रशासन सजग झाल्याचे दिसत आहे, गोपनीय बातमीदार सतर्क झाले आहेत. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कोलरपिंपरी येथील हिलटॉप हायराईन कंपनी येथे 18 डिसेंबरला सायंकाळी साडेसात वाजता धाडसत्र अवलंबले. संबंधित कंपनीत कर्तव्यावर असलेल्या मॅनेजमेन्ट इंचार्ज विल्सन संदीप सिकवेरा (44) यांना विचारणा करत टँकर चालक विजय रामजीत यादव (27) राहणार दोसपुर जि. आंबेडकर नगर (उत्तर प्रदेश) याचे समक्ष वाहनांची तपासणी केली.
ताब्यात घेण्यात आलेल्या टँकर मध्ये अंदाजे तीस हजार लिटर डिझेल असल्याचे चालकाने सांगितले. त्यानुसार पंचनामा करून 21 लाख रुपयांचे डिझेल व 15 लाख रुपयांचा टँकर असा 36 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी महसूल विभागाला कळविण्यात आले. पुरवठा निरीक्षक अमोल भाऊराव कुमरे यांनी दिनांक 21 डिसेंबरला पंचासह टँकरची तपासणी करून वणी पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली आहे.
● बनावट डिझेल सदृश्य पदार्थ असा संशय ●
पोलिस व पुरवठा निरीक्षक यांनी केलेली कार्यवाही कौतुकास्पद असली तरी INDUSTRIAL USE ONLY असे असताना ट्रान्सपोर्ट व्यवसाय औद्योगिक कधी झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. चालकाजवळ GST चालान पावती मिळाली आहे. सदर बनावट डिझेल- डिझेल सदृष्य पदार्थ हा कांडला (गुजरात) येथुन वणी येथे आणण्यात आले आहे. पुरवठा निरीक्षकांनी त्या टँकर मधील द्रव पदार्थाचा नमुना काढून सि.ए. तपासणीसाठी काढला आहे.
● बनावट डिझेलचा पुरवठा करणारे कोण ●
डिझेल सदृष्य द्रव्य तयार करून त्याचा पुरवठा रिद्धी सिद्धी कॅरियर तथा वाहतूक कंत्राटदार गांधीधाम कच्च गुजरात यांचे माध्यमातून हिलटॉप हायराईन कंपनी (Hilltop HIRISH private limited) येथे वापराकरीता पाठविला असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी संबंधित पुरवठादार कंपनी व टँकर चालक विजय रामजीत यादव (27) राहणार दोसपुर जि. आंबेडकर नगर (उत्तर प्रदेश) यांचेवर अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3 व 7 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बनावट डिझेल अथवा बनावट डिझेल सदृश्य पदार्थ वाहनात वापरण्यात येत असल्याचे उघड होत असून शासनाच्या महसुलावर ह्या कंपन्या डल्ला मारत आहेत.
Rokhthok News