● पोलिसांची दणदणीत कारवाई
Crime News Yavatmal : घनदाट जंगल शिवारात गावठी हातभट्टीची दारू गाळणाऱ्या विरोधात यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी दणदणीत कारवाई केली. तिघांना ताब्यात घेत तब्बल 61 हजाराचा मुद्देमाल जप्त करून साहित्याचा नाश करण्यात आला. ही कारवाई शनिवार दिनस्क 23 डिसेंबर ला करण्यात आली. As many as 61,000 worth of material was seized and the materials were destroyed after detaining the three.
यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरोला व जांब शिवारात जंगल सदृष्य भागात काही इसम गावठी हातभट्टीची दारू मोठ्याप्रमाणात गाळत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांना मिळाली. हातभट्टीची दारू गाळणाऱ्या विरोधात यशस्वी मोहीम राबविण्यात आली आणि तीन ठिकाणी धाड सत्र अवलंबले.
देविदास यशवंत शेडमाके , शंकर नारायण सोनवणे दोघेही राहणार जांब व देविदास सर्यभान टेंभरे राहणार खरोला या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी जंगलात आपले साम्राज्य उभे केले होते. मोठया प्रमाणात हातभट्टीच्या माध्यमातून गावठी दारू गळण्यात येत होती.
पोलिसांनी दारूभट्टीचे साहित्य, लोखंडी ड्राम, जर्मन टोपले तसेच तिन्ही ठिकाणावरून एकूण अकराशे लिटर मोहामाच सडवा रसायन ताब्यात घेत साहित्याची तोडफोड करण्यात आली व दारूसह मोहामाच सडवाचा नाश करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड, अतिरिक्त पोलीस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कवरासे, पो.अंमलदार ज्ञानेश्वर मातकर, खूशाल राठोड, पोलिस उपनिरीक्षक प्रेमसींग चव्हाण, निलेश पातूरकर, संदिप मेहत्रे, सचिन पातकमवार, चालक पो.शी. अविनाश वाघाडे , पोलीस पाटील संजय घोडाम रा.जांब यांनी केली.
Rokhthok News