Home Breaking News अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन

अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन

● विमा कवच देणार उंबरकरांची ग्वाही

1564
C1 20231227 15594696

विमा कवच देणार उंबरकरांची ग्वाही

Wani News : तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी बुधवार दिनांक 27 डिसेंबरला आपल्या विविध मागण्यांसाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेलभरो आंदोलन केले. याप्रसंगी मनसे नेते राजू उंबरकर यांनी आंदोलनकर्त्याना तुमचा भाऊ म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट करत मतदारसंघातील सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जीवन विमा काढून देण्याचे आश्वासन दिले. Jail Bharo protested at Chhatrapati Shivaji Maharaj Chowk here for various demands.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वणी विधानसभा मतदारसंघातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जेलभरो आंदोलन केले. राज्य सरकारच्या सर्व योजनांची कामे मतदारसंघात पोहोचवण्याचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात मात्र शासन सातत्याने दुर्लक्षित करतात असा आरोप यावेळी करण्यात आला.

C1 20231227 15591528

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा विचार करून, अंगणवाडी सेविकांना दरमहा 26 हजार रुपये आणि अंगणवाडी मदतनीसांना 22 हजार रुपये मिळावेत तसेच 1 डिसेंबर 2023 पासुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ देण्यात यावी ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी रेटून धरली आहे.

अंगणवाडी कर्मचारी हा समाजातील महत्वाचा घटक असुन बालकांचे पोषण व जडणघडण करण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. अंगणवाडीतुनच लहान बालकांना चांगले संस्कार देणे, त्यांच्या आरोग्य विषयक बाबींची दक्षता घेणे, त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रयत्न करणे आदी कामांसोबत गरोदर माता भगिनींचे सर्वेक्षण करून माता व बालकाचे आरोग्य सुदृढ राहील याची दक्षता घेणे आदी कामे अंगणवाडी सेविका व मदतनीस पार पाडतात.

तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी
राज्य सरकारच्या सर्व योजनांची कामे मतदारसंघात पोहोचवण्याचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस पार पाडतात. परंतु त्यांच्या समस्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी मनसेचे नेते राजू उंबरकर यांना सांगितले. याप्रसंगी बोलताना तुमचा भाऊ या नात्याने मी तुमच्या पाठीशी सदैव आहे. त्यामुळे तुमच्या सोबत कोणीही नाही असा ग्रह करू नका. पुढील काळात मतदारसंघातील सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जीवन विमा काढून देण्याचे आश्वासन दिले.
Rokhthok News