● स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भवादी आक्रमक
Wani News : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी होत असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ विदर्भवादी कार्यकर्त्यांनी तिव्रस्वरुपांचे आंदोलन केले. वरोरा बायपास वरील महामार्गावर रविवार दिनांक 31 डिसेंबरला दुपारी टायर जाळून रास्तारोको करण्यात आला. यामुळे बराचवेळ वाहतुक ठप्प झाली होती. Vidarbha activists staged intense protests in support of the hunger strike.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मिती साठी विदर्भ योद्धा ॲड वामनराव चटप व इतर कार्यकर्ते 27 डिसेंबर 2023 पासून नागपूर येथील संविधान चौकात आमरण उपोषणाला बसलेले आहेत. तसेच ॲड. सुरेश वानखेडे व मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हा कार्यालयासमोर सुद्धा ॲड. चटप साहेब यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषन सुरू आहे.
सलग पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषण मुळे काही कार्यकर्त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे विदर्भवादी कार्यकर्त्यांत संतापाची भावना निर्माण होत आहे. शासनस्तरांवरुन कोणतीही हालचाल होत नसल्याने भविष्यात आंदोलन आनखी तिव्र होण्याची चिन्हे दिसु लागली आहे.
विदर्भवादी नेते ॲड. वामनराव चटप यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी येथील रेल्वे फाटका जवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ रस्ता वाहतूक बंद झाली आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानी काही काळापुरते तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या आंदोलनात प्रा. पुरुषोत्तम पाटील, बाळासाहेब राजूरकर, राजू पिंपळकर, देवराव धांडे, दशरथ पाटील, अजय धोबे, नामदेव जनेकर, मुक्तानंद भोंगळे, संदीप गोहोकर, होमदेव कणाके, देवा बोबडे, कलाबई क्षीरसागर, धीरज भोयर, दिनेश रायपूरे, राकेश वराटे, अलका मोवाडे, दत्ता डोहे, संकेत खीरटकार, मंगल तेलंग, अक्षय कवरासे, रितेश बलकी, कृष्णराव भोंगळे, आयुब शेख, मंजुषा तिरपुडे, कमलेश भगत, संजय सोमलकर, शशिकांत बोढे, काशिनाथ देऊळकर, प्रभाकर उईके, सुमन जनेकार, बेबी पिंपळशेंडे, सुषमा पाटील, नितेश तुरानकर, सुजित गाताडे, चंद्रकांत दोडके, मारोती मोवाडे यासह विदर्भवादी उपस्थित होते.
Rokhthok News