● कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन
Wani News :- शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन येथील काँग्रेस कमिटीने वणी दौऱ्यावर आलेल्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन दिले. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे. A statement was given to Agriculture Minister Dhananjay Munde who came on Wani tour.
राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे बुधवार दिनांक 3 जानेवारीला चंद्रपूर येथिल कृषी प्रदर्शनाच्या आयोजित कार्यक्रमासाठी आले होते. परतीच्या प्रवासात त्याचे निकटवर्तीय असलेले डॉ महेंद्र लोढा यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली.
यावेळी कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष घनश्याम पावडे, राकेश खुराणा, जय आबड, जयसिंग गोहोकार यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यात यावा, पुरबुडी, ओल्या दुष्काळा मुळे नष्ट झालेल्या पिकाची नुकसानभरपाई मिळण्यात यावी,
शेतकऱ्यांना सिंचनाकरिता दिवसाला रोज 10 तास वीज मिळावी, कापसाला 12 हजार रुपये प्रति क्विंटल, सोयाबीन ला 8 हजार, तुरीला 13 हजार रुपये आधारभूत किंमतीच्या दीडपट भाव देण्यात यावा तसेच जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्याकरिता तारकुंपणाला सरसकट अनुदान देण्यात यावे या मागणीचे निवेदन सादर केले.
Rokhthok News