Home क्राईम Crime: दोन सराईत गुन्‍हेगारांना पोलिसांनी ‘उचलले’

Crime: दोन सराईत गुन्‍हेगारांना पोलिसांनी ‘उचलले’

● एक वर्षापासुन होते फरार ● 5 पोलीस ठाण्‍यातील 6 गुन्‍हयात समावेश

1594
C1 20240110 13293560

एक वर्षापासुन होते फरार
5 पोलीस ठाण्‍यातील 6 गुन्‍हयात समावेश

Crime News Wani | पाच पोलीस ठाण्‍याअंतर्गत गुन्‍हे करुन पोलीसांना गुंगारा देणारे दोन सराईत गुन्‍हेगार वणी पोलीसांनी शिताफीने ताब्‍यात घेतले. यामुळे एकुन सहा गुन्‍हयाची उकल झाली आहे. ठाणेदार अजित जाधव यांना  मिळालेल्‍या गोपनीय माहितीच्‍या आधारे सदर कारवाई स्‍थानिक डीबी पथकाने केली. Two inn criminals were taken into custody by the police.

अनिल विनायक येमुलवार (22) व दिनेश रविंद्र मेश्राम (20) हे दोघेंही सराईत गुन्‍हेगार येथील खरबडा मोहल्‍ला परिसरातील निवासी आहेत. त्‍यांनी वडगांव (जंगल), शिरपुर, मारेगांव, राळेगांव व वणी पोलीस ठाण्‍याच्‍या अंतर्गत विविध गुन्‍हे केले आहेत. गुन्‍हे केल्‍यानंतर ते एक वर्षापासुन पसार होते.

वणी पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील गुन्ह्यांचा तपास करत असतांना त्‍या सराईत गुन्‍हेगारांचा सुगावा लागत नव्‍हता. ते वारंवार त्याची अटक चुकवुन पोलीसांना गुंगारा देत होते. त्‍यातच ठाणेदार अजित जाधव यांना गोपनीय माहितगारांने फरार गुन्‍हेगारांबाबत टिप दिली. आरोपी पिंपळखुटा ता.आर्वी जि. वर्धा येथे असल्‍याचे सांगीतले.

फरार सराईत गुन्‍हेगारांच्‍या मुसक्‍या आवळण्‍याकरीता डीबी पथकाचे सपोनि माधव शिंदे यांच्‍या नेतृत्‍वात एक पथक वर्धा जिल्‍हयात रवाना करण्‍यात आले. खरांगणा पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील पिंपळखुटा येथे पोलीसांनी धाडसञ अवलंबले असता आरोपी अनिल येमुलवार व दिनेश मेश्राम याच्‍या मुसक्‍या आवळण्‍यात आल्‍या. त्‍यांना विस्‍तृत विचारणा केल्‍यानंतर त्यांनी गुन्‍हयाची कबुली दिली. याप्रकरणी सहा गुन्‍हयाची उकल झाली आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्‍सोड, अप्‍पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, सपोनि माधव शिंदे, सुदर्शन वानोळे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, वसिम शेख यांनी केली.
Rokhthok News