Home Breaking News विद्यार्थ्यांचा आक्रोश…  SDO कार्यालयांवर धडक

विद्यार्थ्यांचा आक्रोश…  SDO कार्यालयांवर धडक

● TCS/IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षा रदद करा

1609
C1 20240111 13290906

TCS/IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षा रदद करा

WANI NEWS :  TCS/IBPS मार्फत संपुर्ण महाराष्ट्रात विविध पदांच्‍या परिक्षा घेण्‍यात येत आहे. त्‍यात प्रचंड गोंधळ होतांना दिसत असुन अनेक विद्यार्थ्यांवर अन्‍याय होतोय. यामुळे विद्यार्थ्यांत संतप्‍त भावना निर्माण झाली असुन वणीतील हजारो विद्यार्थ्यांनी दिनांक 11 जानेवारीला दुपारी आक्रोश करत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत मुख्‍यमंञी यांना निवेदन पाठवले आहे. Thousands of students protested and stormed the Sub-Divisional Officer’s office.

संपुर्ण महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा खुप मोठा युवा वर्ग आहे. परंतु सद्यस्थितीत स्पर्धा परीक्षा क्षेत्रात जो घोळ चालला आहे त्‍यामुळे विद्यार्थी वर्ग संतप्‍त झाला आहे. काही ठिकाणी तलाठी भरतीत 200 पैकी 214 गुण देण्यात आल्‍याच्‍या घटना घडल्‍याने घेण्‍यात आलेल्‍या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे स्‍पष्‍ट होत आहे.

शहरात हजारो विद्यार्थ्यांनी रोष व्‍यक्‍त करत उप विभागीय अधिकारी यांचे कार्यालयावर धडक दिली आहे. यावेळी त्‍यांनी उप विभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्‍यमंञी यांना निवेदन पाठवले आहे. त्‍यात विविध मागण्‍या रेटून धरण्‍यात आल्‍या आहेत.

राज्‍यात स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने न घेता ऑफलाईन पध्दतीने एकाच दिवशी घेण्यात याव्या व स्पर्धा परीक्षा घेण्याची जबाबदारी TCS/IBPS कडुन सरकारने काढुन घ्यावी तसेच सरळसेवा, स्पर्धा परीक्षा MPSC मार्फत ऑफलाइन पध्‍दतीने घेण्‍यात याव्‍या अशी आग्रही मागणी करण्‍यात आली आहे.

राज्‍यात तलाठी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे, त्यामूळे या प्रकरणाची SIT मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी व ही भरती रद्द करुन नव्याने भरती घेण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, पेपरफुटी संदर्भात कठोर कायदा करुन त्या कायद्यानुसार दोषींवर कडक कार्यवाहिची तरतूद करावी,  रखडलेली पोलीस भरती तात्काळ घेण्यात यावी व भरतीची जाहिरात आचारसंहिता लागण्यापुर्वी देण्यात यावी, शिक्षक भरती तात्काळ करण्यात यावी व नियुक्ती लवकरात लवकर देण्यात यावी आदी मागण्‍या चे निवेदन देण्‍यात आले आहे.
Rokhthok News