● पाच लाखाच्यावर मुद्देमाल जप्त
● दोन दारू तस्करावर गुन्हे दाखल
Wani News : वणी शहरातून घेतलेल्या दारू साठ्याचा पुरवठा शिंदोला शिवारात करण्यात येत होता. या बाबत शिरपूर ठाणेदारांना डस्टर कंपनीच्या चारचाकी वाहनातून दारूची तस्करी होत असल्याची टीप मिळाली. रविवारी दुपारी चारगाव चौकी येथे नाकाबंदी केली असता 12 हजार 960 रुपयांच्या विदेशी दारूसह 5 लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. A vehicle worth Rs 5 lakh was seized along with foreign liquor worth Rs 12 thousand 960.
शिंदोला परिसरात काही दारू विक्रेते लपूनछपून अवैध दारूचा ठिय्या चालवतात. त्यात अग्रेसर असलेल्या गुन्हेगारांवर या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चारगाव चौकी येथे नाकाबंदी करण्यात आली असता डस्टर कंपनीचे वाहन क्रमांक MH- 29 – AR- 1638 या संशयित वाहनांची झाडाझडती घेतली.
कारवाई दरम्यान वाहन चालक राजू मारुती अलिवर राहणार गायकवाड नगर वणी याला ताब्यात घेतले. यावेळी वाहनात 72 नग RS कंपनीच्या विदेशी 180 मिली क्षमतेच्या विदेशी दारूच्या बॉटल आढळून आल्या. हा माल कोणाचा आहे असे कसून विचारणा केली असता शेख आरिफ शेख इब्राहिम याचा असल्याचे सांगितले.
पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपी विरुद्ध कलम 65 (अ)( ई) म दा का 109 भा द वी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, sdpo गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ठाणेदार संजय राठोड, सुगत दिवेकर, आशिष टेकाडे, राजन इसनकर व अंकुश कोहचाडे यांनी केली.
Rokhthok News