Home क्राईम LCB Raid : जंगलात कोंबडबाजार, 7 आरोपी अटकेत

LCB Raid : जंगलात कोंबडबाजार, 7 आरोपी अटकेत

● सव्‍वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्‍त

2185
C1 20240115 18191717

सव्‍वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्‍त

LCB Raid News : उपविभागात पुन्‍हा कोंबड बाजाराने जोर पकडला की काय असे वाटायला लागले आहे. (LCB) स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने पाटण पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत कोडपा खिंड जंगलसदृष्‍य भागात धाड टाकली. यावेळी कोंबड्याच्या झुंजी लावून हारजित करणाऱ्या सात आरोपींना ताब्‍यात घेत दोन लाख 25 हजार 860 रुपये किमतीचा मुददेमाल जप्‍त करण्यात आला. ही कारवाई रविवार दिनांक 14 जानेवारीला दुपारी करण्‍यात आली. A team of the local crime branch raided the forest-like area of ​​Kodapa khind under Patan police station limits.

वणी उपविभागात कोंबड्याच्या झुंजी लावून मोठ्या प्रमाणात जुगार खेळल्‍या जातो. मारेगांवातुन खऱ्याअर्थाने कोंबड बाजाराला सुरुवात झाली. त्‍यानंतर मुकूटबन हददीतसुध्‍दा काही जुगाऱ्यांनी प्रयत्‍न केले. आतातर आदिवासी बहुल व तेलंगणा राज्‍याच्‍या सिमेवर असलेल्‍या पाटण पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत LCB ने धाडसञ अवलंबत कोंबडबाजारावर कारवाई केली.

पाटण ठाण्‍याच्‍या हद्दीतील कोडपा खिंडी गावाचे बाजुला असलेल्या जंगलामध्ये सार्वजनिक ठिकाणी खुल्या जागेत कोंबड बाजार सुरु असल्‍याची गोपनिय माहिती स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाला मिळाली. पोलीसांनी सापळा रचला असता,  त्‍या  ठिकाणी कोंबडयाच्या पायाला लोखंडी काती बांधुन झुंज सुरु असल्‍याचे दिसले तर काही इसम त्‍यावर पैशाची बाजी लावून हारजित करत होते.

पोलीसांनी धडक कारवाई करत गंगाधर अय्या आत्राम (25) रा. माडवा ता. झरी, जिवन सुनिल मानकर (25)  रा. कोडपा खिंड, अनिल रामचंद्र पावडे (56) रा. लहान पांढरकवडा, भिमराव धर्माजी पेंदोर (44) रा. टेंबी ता. झरी, शंकर विठ्ठल आकुलवार (30) रा. माडवा ता. झरी, शंकर सुर्यभान बोपाटे (41) मारकी ता. झरी, लक्ष्मण रामा आत्राम (40) रा. माडवा ता. झरी यांना ताब्‍यात घेतले. त्‍यांचे जवळून 18 हजार 780 रुपयाची रोकड, 4 नग लोखंडी काती व 4 कोंबडे तसेच 7 दुचाकी असा एकुण दोन लाख 25 हजार 860 रुपयाचा मुद्देमाल हस्‍तगत करण्‍यात आला.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्‍सोड, अप्‍पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, पोलीस निरिक्षक LCB आधारसिंग सोनोने, API अतुल मोहनकर, API ठाणेदार संदिप पाटील, योगेश डगवार, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके तसेच अमित पोयाम यांनी केली.
ROKHTHOK NEWS