● चोरीच्या पाच मोटर सायकल हस्तगत
● पावणे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त
Wani News : मोटार सायकल चोरटा चोरीची दुचाकी विकण्याच्या प्रयत्नात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचे ताब्यातून एक लाख 75 हजार रूपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. ही कारवाई दिनांक 16 जानेवारीला करण्यात आली. Five motorcycles worth Rs 1 lakh 75 thousand were seized.
स्थानिक गुन्हे शाखा (LCB) च्या पथक प्रमुखाला प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे किरण पेट्रोल पंप पांढरकवडा मार्गावर सापळा रचण्यात आला. एक इसम होन्डा कंपनीची ड्रिम युगा काळया रंगाची लाल पट्टा असलेली मोटर सायकल क्रमांक MH-32-AN-1371 विकण्याचा प्रयत्न करत होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही बाब वरिष्ठांना कळवली. याबाबत शहानिशा करून गणेश पांडुरंग कुडमेथे उर्फ (गणेश भाउराव घोडाम) (35) रा. इंदीरा आवास घाटी ता. घाटंजी जि. यवतमाळ याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने विविध ठिकाणी चोरलेल्या दुचाकी बाबत कबुली दिली.
चोरट्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली मोटर सायकल ही पोलीस ठाणे मारेगांव जि.यवतमाळ हद्दीतुन चोरल्याचे उघड झाले. तसेच त्याचे जवळून हिरोहोन्डा स्प्लेंडर क्रमांक MH-29-X-9897, विना नंबरची स्प्लेंडर आय स्मार्ट, हिरोहोन्डा स्प्लेंडर MH-29-AQ-9951, हिरोहोन्डा पॅशन MH-29-AY-5209 जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, पोलीस निरीक्षक LCB आधारसिंग सोनोने यांचे मार्गदर्शनात API अतुल मोहनकर, API अमोल मुड़े, सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधिर पांडे, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके यांनी पार पाडली.
Rokhthok News