Home Breaking News आणि…. तो क्षण सुवर्णाक्षरात लिहल्‍या जाईल

आणि…. तो क्षण सुवर्णाक्षरात लिहल्‍या जाईल

● केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी यांचे प्रतिपादन

1139
C1 20240123 16283719

● केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी यांचे प्रतिपादन

Wani News : पाचशे वर्षा पासुन ज्‍या क्षणाची आतुरतेने वाट बघीतल्‍या जात होती तो दिवस 22 जानेवारीला उजाडला. अयोध्‍येत “रामलल्‍ला”च्‍या मंदिराचे उदघाटन व प्राणपतिष्‍ठापना करण्‍यात आली तो क्षण सुवर्णाक्षरात लिहल्‍या जाईल असे भावनात्‍मक वक्‍तव्‍य केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी केले. वणी येथे दौऱ्यावर आलेले असतांना त्‍यांनी पञकारांच्‍या विविध प्रश्‍नाला यथोचित उत्‍तरे दिली. The moment of inauguration and inauguration of the temple of “Ramlalla” in Ayodhya will be written in golden letters.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांचे संकल्‍प याञेच्‍या निमित्‍ताने नियोजीत दौऱ्यात माजी केंद्रीय गृहराज्‍य मंञी तथा राष्‍ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्‍यक्ष हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष तारेंद्र बोर्डे, चंद्रपुर-आर्णी लोकसभा विस्‍तारक रवी बेलुरकर, विजय चोरडिया,  विजय पिदुरकर, दिनकर पावडे, गजानन विधाते प्रामुख्‍याने उपस्थित होते.

C1 20240123 16300037
केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी संवाद साधताना

केंद्रिय पेट्रोलीयम मंञी हरदिपसिंग पुरी यांचे आगमन दुपारी बारा वाजता झाले. सर्वप्रथम एसबी लॉन मध्‍ये आयोजीत कार्यक्रमात त्‍यांनी केंद्र शासनाच्‍या विविध योजने बाबत विस्‍तृत माहिती उपस्थितांना दिली. तर उज्‍वला गॅस सिलेंडरचे लाभार्थ्‍यांना वाटप करण्‍यात आले. तसेच नगर पालीका क्षेञातील घरकुल व सहाय्यता निधीचे धनादेश लाभार्थ्‍यांना दिले.

पञ परिषदेत बोलतांना केंद्रिय पेट्रोलीयम मंञी हरदिपसिंग पुरी म्‍हणाले की, भारताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठी झेप घेतली आहे. प्रत्‍येक योजना थेट लाभार्थ्‍यांपर्यंत पोहचत आहे. शेवटच्‍या घटकापर्यंत योजना पोहचावी याकरीता केंद्र शासन कटिबध्‍द असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले. उज्‍वला योजना, प्रधानमंञी आवास योजना, मुद्रा लोन यासर्व योजनांचे देशभरात करोडो लाभार्थी असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्ट केले.
Rokhthok News