Home Breaking News त्या.. अधिकाऱ्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन..!

त्या.. अधिकाऱ्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन..!

● मनसेच्‍या रडारवर वाहतुक उपशाखा ● गंभीर आरोपांचे वरिष्‍ठांना निवेदन

1569
C1 20240204 21555164

मनसेच्‍या रडारवर वाहतुक उपशाखा
गंभीर आरोपांचे वरिष्‍ठांना निवेदन

Wani News : वाहतुक उपशाखेच्‍या माध्‍यमातुन उपविभागात चाललेल्‍या अनागोंदीची दखल महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. येथील वाहतुक शाखेच्‍या सपोनि (API) सिता वाघमारे यांचेवर गंभीर आरोप करण्‍यात आले आहे. याप्रकरणी मनसे वाहतुक शाखेच्‍या राज्‍य उपाध्‍यक्षांनी दिनांक 03 फेब्रुवारीला राज्य सरकारच्या संबंधित मंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. Sita Waghmare (API) of Police Transport Branch has been accused of serious charges.

उपविभागात मोठया प्रमाणात वाहतुकदार कंपन्‍यांचे नेटवर्क आहे. कोळसा, सिमेंट व अन्‍य गौण खनिजांची होणारी वाहतुक येथील वाहतुक उपशाखेकरीता सोन्‍याचं अंड देणारी कोंबडी आहे. परिसरातील अस्‍ताव्‍यस्‍त वाहतुकीवर आळा बसावा याकरीता वाहतुक उपशाखेचे गठण काही वर्षापुर्वी करण्‍यात आले होते. माञ वाहतुक शाखा सातत्‍याने वादाच्‍या भोवऱ्यात अडकतांना दिसत आहे.

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या रडारवर वाहतुक शाखा आल्‍याचे सकृतदर्शनी दिसत आहे. मनसे नेते राजु उंबरकर यांचे मार्गदर्शनाखाली मनसे वाहतुक सेनेच्या राज्‍य उपाध्यक्षांनी वाहतुक शाखेच्‍या API सिता वाघमारे व एका कर्मचाऱ्यांविरुध्‍द कथित आर्थिक वसुलीचे गंभीर आरोप करुन खळबळ उडवून दिली आहे.

आर्थिक उलाढालीसाठी वणी शहर यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात प्रसिद्ध आहे. मोठया प्रमाणात प्रवासी वाहनांचे अवागमन शहरात असते. त्‍या प्रमाणेच कोळसा व त्‍यावर आधारीत व्‍यवसायामुळे अवजड वाहनांचे होणारे दळणवळण वाहतुकदार कंपन्‍याच्‍या माध्‍यमातुन होत असते. शहरात ठिक-ठिकाणी असलेले प्रवासी वाहतुकीचे थांबे तसेच ट्रॅव्‍हल्‍स पॉइंट यासर्व वाहनधारकांची आर्थिक पिळवणुक होत असल्‍याचा गंभीर आरोप निवेदनातुन करण्‍यात आला आहे.

वाहतूक शाखेच्या यासर्व अनागोंदी कारभारामुळे शहरातील वाहतूक व्‍यवस्‍था आणि पार्किंगचा बट्ट्याबोळ झाला आहे. वाहतूक शाखेच्या या मस्तवाल आणि अनियंत्रित कारभारामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे. तरी वाहतुक शाखेच्‍या अधिकारी व संबधीत कर्मचारी यांची विस्‍तृत चौकशी करुन फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावे. तसेच त्‍यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे अशी मागणी निवेदनातुन करण्‍यात आली आहे.
Rokhthok News