Home Breaking News LCB raid : प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुसह एक अटकेत

LCB raid : प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुसह एक अटकेत

● एक लाख 88 हजाराचा मुददेमाल जप्‍त

625
C1 20240219 08290926

एक लाख 88 हजाराचा मुददेमाल जप्‍त

Crime News : शिरपुर पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतून दुचाकीवरुन प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची तस्‍करी होत असल्‍याची गोपनीय माहिती स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाला मिळाली. पठारपुर फाट्याजवळ सापळा रचला असता एकाला ताब्‍यात घेत एक लाख 88 हजार रुपयांचा प्रतिबंधीत तंबाखुसह मुददेमाल जप्‍त करण्‍यात आला. ही कारवाई शनिवारी पहाटे करण्‍यात आली. The local crime branch team received confidential information about smuggling of prohibited flavored tobacco.

वणी उपविभागात प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची मोठया प्रमाणात मागणी आहे. याकरीता परराज्‍यातुन प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची तस्‍करी करण्‍यात येते. वणी शहर व लगतच्‍या जिल्‍हयातील बरेच तस्‍कर कार्यरत आहेत दररोज लाखो रुपयांची उलाढाल या अवैध धंद्यातून केल्‍या जाते. पोलीस प्रशासन बऱ्याचदा कारवाई करतात माञ खरे व मोठे मासे गळाला लागल्‍याचे ऐकीवात नाही.

LCB पथकाने प्राप्‍त माहितीच्‍या आधारे पठारपुर फाटयाजवळ पहाटे सापळा रचला. यावेळी दुचाकीवर पांढऱ्या रंगाच्‍या चुंगडया घेवून जात असतांना एक इसम आढळुन आला. त्‍याची झडती घेतली असता त्‍याचे जवळ महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला मजा 108 हुक्का शिशा सुगंधीत तंबाखु 200 ग्राम क्षमतेचे 80 पॅकेट, इगल हुक्का शिशा सुगंधीत तंबाखु 400 ग्राम क्षमतेचे 14 पॅकेट व 200 ग्राम क्षमतेचे 20 पॅकेट, होला हुक्का शिशा सुगंधीत तंबाखु 200 ग्राम क्षमतेचे 50 पॅकेट, असा प्रतिबंधीत केलेला तंबाखु आढळुन आला.

या कारवाईत नितीन कवडू राजुरकर (32) रा. नेरड (पुरड) ता. वणी याला ताब्‍यात घेण्‍यात आले असुन अन्न व सुरक्षा अधिकारी यांचे फिर्यादीवरुन गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, PI स्थानिक गुन्हे शाखा, आधारसिंग सोनोने, यांच्या मार्गदर्शनात,  API अमोल मुडे, PSI रामेश्वर कांडुरे,  सुनिल खंडागळे, योगेश डगवार,  सुधिर पांडे,  सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी या LCB पथकाने केली.
ROKHTHOK NEWS