Home Breaking News धडाका…महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत “In coming”

धडाका…महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत “In coming”

● हजारो महिलांचा मनसेत प्रवेश ● वेध लोकसभा निवडणुकीचे

597
C1 20240225 17360891

हजारो महिलांचा मनसेत प्रवेश
वेध लोकसभा निवडणुकीचे

MNS NEWS WANI | वणी मतदारसंघातील झरी तालुक्यात हजारो महिलांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्षनेते राजू उंबरकर यांच्या उपस्थितीत मनसेत पक्षप्रवेश केला. पक्षाचे विचार आणि कार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम नक्कीच यशस्वीरीत्या पार पाडतील असा विश्वास यावेळी मनसे नेते राजू उंबरकर यांनी व्यक्त केला. Thousands of women in Zari taluka joined the MNS party in the presence of party leader Raju Umbarkar believing in the leadership of Raj Thackeray.

राजू उंबरकर यांच्या सर्वसमावेशक व जनहितार्थ कार्यामुळे प्रभावित होऊन मनसेत प्रवेश करत असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. मनसेच्या माध्यमातून शिक्षण, रोजगार, आरोग्य, लग्न असेल आदी सारख्या प्रत्येक वेळी उंबरकर मदतीला धावून येतात हीच मनसेची शिकवण असल्याचे यावेळी उपस्थित महिलांनी मान्य केले. येणाऱ्या काळात राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात मनसेला विजयी करण्यासाठी जिवाचं रान करू असेही स्पष्ट करत वणी मतदारसंघात मनसेचा उमेदवार विजयी करून विधानसभेत पाठवण्याचा निर्धार महिलांनी केला.

मनसेची महाराष्ट्रात ताकद वाढताना दिसत आहे. मनसे गाव-खेड्यापर्यंत पुन्हा एकदा जास्त घट्ट होताना दिसत आहे. त्यामुळे मनसे पक्षात कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या पक्षप्रवेशाला महत्त्व प्राप्त झालं आहे. या पक्षप्रवेशामुळे पक्षाची ताकद अधिक वाढणार असून निवडणुकीत याचे परिणाम दिसतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

यावेळी वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, महिला सेना मनसे जिल्हाध्यक्षा सौ. अर्चना बोधाडकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे, झरी न. प. चे नगर उपाध्यक्ष नानु कोडापे, आरोग्य सभापती प्रवीण लेनगुळे, तालुकाध्यक्ष गजानन मिलमिले, गुलाब आवारी, फाल्गुन गोहोकार, मोहन अर्के, विलन बोधाडकर, विठ्ठल हेपट, काशिनाथ कुमरे, चेतन हेपट, शिवराज पेचे, पप्पू चुक्कलवार, मुस्ताख शेख, संगिता कोडापे, छाया रोयपाटे, शोभा तलांडे, वर्षा गोहने, बेबी उईके आदी उपस्थित होते.

संकटे पेलण्यास समर्थ

Fb Img 1709021597227
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पुरूषांसोबतच महिला भगिनी देखील मनसेत पक्षप्रवेश करत आहेत. एक विश्वासू नेतृत्व म्हणून राजसाहेब ठाकरे यांच्याकडे पाहिले जात असून हा पक्ष प्रवेशाचा धडाका असाच कायम राहील. महिला भगिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपल्या पक्षाची शिकवण आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा संकटे येतील तेव्हा तेव्हा मी संकटे पेलण्यास समर्थ आहे.
राजू उंबरकर
नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Rokhthok News