Home Breaking News घटनास्थळ एक अपघात दोन, एक ठार, दुसरा जखमी

घटनास्थळ एक अपघात दोन, एक ठार, दुसरा जखमी

● एक दुचाकीस्वार ठार तर दुसरा जखमी ● संविधान चौकात घडली घटना

3378
Image Search 1709112188605

एक दुचाकीस्वार ठार तर दुसरा जखमी
संविधान चौकात घडली घटना

Accident News | यवतमाळ मार्गावरील बायपास वर अपघाताची शृंखला बघायला मिळते. भरधाव हकण्यात येणारी अवजड वाहने याला कारणीभूत ठरते आहे. बुधवार दिनांक 28 फेब्रुवारीला दुपारी एकाच घटनास्थळी विचित्र अपघात घडला. यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. One youth died on the spot while another youth was injured.

Img 20250422 wa0027

बुधवारी दुपारी दोन दुचाकीवर दोघे तरुण जात असताना भरधाव येणाऱ्या दोन ट्रकने दोन दुचाकीला धडक दिली. ट्रक क्रमांक MH-34- AB-6232 याने दुचाकी क्रमांक MH-34-AC- 9047 ला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार याचा जागेवरच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत ट्रक क्रमांक MH-34- BG-2082 या ट्रकने दुचाकी क्रमांक म्ह-29असा-2326 ला धडक दिली मात्र दुचाकीस्वाराने उडी मारल्यामुळे त्याचा जीव वाचला.

Img 20250103 Wa0009

संविधान चौकात घडलेल्या विचित्र अपघातात एकाचा घटनास्थळी च मृत्यू झाला तर दुसरा तरुण जखमी झाला आहे. घटना घडताच युवा सेनेचे अजिंक्य शेंडे घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात हलवले व पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घडलेल्या अपघातात मृतकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News