Home Breaking News वनरक्षक पदभरती साठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

वनरक्षक पदभरती साठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

● तरुणांच्या मृत्यूने पसरली शोककळा

2413
C1 20240305 18065290

तरुणांच्या मृत्यूने पसरली शोककळा

Sad News Wani | शासकीय नोकरी मिळवायची हे स्वप्न घेऊन तो तयारीला लागला होता मात्र नियतीला हे मान्य नव्हते. नागपूर येथे वनरक्षक पदाच्या भरतीसाठी गेलेल्या पेटूर येथील 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि 4 मार्चला घडली. Death of a 28-year-old youth from Petur who went to Nagpur for the recruitment of forest guards

वणी तालुक्यातील पेटूर येथील सचिन दिलीप लांबट (28) ह्या तरुणाची घरची परिस्थिती हलाखीची, वडील शेती करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात शासकीय नोकरी मिळवायची अशी जिद्द सचिन ने मनाशी बांधली होती आणि त्या दिशेने तो तयारीला लागला होता.

वणी येथे राहून तो दररोज शासकीय मैदानावर सराव करून येथील अभ्यासिका केंद्रात अभ्यास करायचा. नागपूर येथे वनरक्षक पदाच्या जागे साठी त्याने लेखी परीक्षा दिली त्या परीक्षेत उत्तम गुणाने तो उत्तीर्ण देखील झाला त्यामुळे शारीरिक चाचणी करिता त्याला बोलावण्यात आले होते.

दि 21 व 22 फेब्रुवारीला नागपूर येथे शारीरिक चाचणी घेण्यात आली होती मात्र शारीरिक चाचणी घेते वेळी आयोजकांचे नियोजन बारगळले त्यामुळे अनेक उमेदवारांनी या शारीरिक चाचणी प्रक्रियेवर आक्षेप नोंदविला होता. चूक लक्षात आल्याने वन विभागाने पात्र उमेदवारांना दि 4 मार्चला पुन्हा शारीरिक चाचणी साठी बोलाविले होते.

या शारीरिक चाचणीला सचिन गेला होता, धावत असताना अखेरच्या 10 मिटर अंतरावर सचिन पडला त्याला नागपूर येथील वनविभागाच्या चमूने नागपुरातील एम्स रुग्णालयात दाखल केले. रात्री 11 वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सचिन हा सामान्य कुटुंबातील तरुण होता. त्याचे स्वप्न अधुरे राहिले त्याच्या अचानक जाण्याने अनेकांचे डोळे पाणावले.
Rokhthok News

Previous articleAPI माधव शिंदे शिरपूरचे नवे ठाणेदार
Next articleSAD NEWS: तरुणाने गळफास घेत संपवले जीवन
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.