Home Breaking News प्रतिभा धानोरकर यांना अविरोध निवडून द्या

प्रतिभा धानोरकर यांना अविरोध निवडून द्या

● मविआच्‍या स्‍थानिक नेत्‍यांचे आवाहन

2432
C1 20240313 19333862

मविआच्‍या स्‍थानिक नेत्‍यांचे आवाहन

Wani News | चंद्रपुर- वणी -आर्णी लोकसभेचे दिवंगत खासदार बाळु धानोरकर यांचे अल्‍पशा आजाराने निधन झाले होते. माञ सार्वञिक निवडणुकांचा कालावधी जवळ असल्‍याने पोटनिवडणुक घेण्‍यात आली नाही. तरी या सार्वञिक निवडणुकीत राज्‍याची संस्‍कृती व परंपरा तसेच सहानुभूती बघता दिवंगत खासदार बाळु धानोरकर यांच्‍या अर्धांगीनी आ. प्रतिभा धानोरकर यांचे विरोधात कोणताही उमेदवार न देता त्‍यांना अविरोध संसदेत पाठवावे असे आवाहन महाविकास आघाडीच्‍या स्‍थानिक नेत्‍यांनी पञ परिषदेत केले. mla Pratibha Dhanorkar should be sent to Parliament unopposed without fielding any candidate against him

चंद्रपुर वणी आर्णी लोकसभेच्‍या निवडणुकी करीता कॉग्रेस पक्षाच्‍या वतीने आ. प्रतिभा बाळु धानोरकर यांची उमेदवारी निश्चित समजल्‍या जात आहे. त्‍यांनाच लोकसभेच्‍या रिंगणात उतरवावे असा मतप्रवाह मतदारसंघातील मतदारांचा आहे. त्‍यातच त्‍यांना मिळणारी सहानुभूती लक्षात घेता भाजपाने सुध्‍दा सावध पाविञा घेत उमेदवारांबाबत “इलेक्‍टीव्‍ह मेरीट” हा फार्मुला अमलात आणल्‍याचे दिसत असून महाराष्ट्रातील भारदस्त नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी निश्चित होणार असल्याचे दिसत आहे.

C1 20240313 19362773

लोकसभेच्‍या मागील सार्वञिक निवडणुकीत कॉग्रेस मुक्‍त महाराष्‍ट्र करण्‍याचे भाजपाचे स्‍वप्‍न चंद्रपुर-आर्णी लोकसभा मतदारसंघाने धुळीस मिळवले होते. ही बाब भाजपा पक्षश्रेष्‍ठींच्‍या चांगलीच जिव्‍हारी लागली होती. दिवंगत खासदार सुरेश ऊर्फ बाळु धानोरकर यांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्‍यानंतर त्‍यांनी कॉग्रेस पक्षात आपले आगळेवेगळे स्‍थान निर्माण केले होते परंतु काही महिन्‍यापुर्वी त्‍यांचे अल्‍पशा आजाराने निधन झाले.

बाळु धानोरकर यांच्‍या निधनानंतर मतदारसंघाची सर्व सुञे त्‍यांच्‍या पत्‍नी आ. प्रतिभा धानोरकर यांनी हाती घेतली आहे. लोकसभा निवडणुक लढवायचीच असा “प्रण” त्‍यांनी केला आहे. पक्षश्रेष्‍ठी सुध्‍दा अनुकूल आहे माञ आपली परंपरा लक्षात घेता सहानुभूती म्‍हणुन विरोधकांनी सुध्‍दा ही निवडणुकच अविरोध करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्‍या स्‍थानिक नेत्‍यांनी केली आहे.

आयोजीत प्रञकार परिषद मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात बुधवार दिनांक 13 मार्चला घेण्यात आली. याप्रसंगी प्रा. टिकाराम कोंगरे, ऍड. देविदास काळे, संजय खाडे,  राजीव कासावार, वंदना आवारी,  राजु एल्‍टीवार,  राष्‍ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे डॉ विजय नगराळे, ऍड. मोरेश्‍वर पावडे, तेजराज बोढे, ओम ठाकुर, पुरुषोत्‍तम आवारी, विवेकानंद मांडवकर यांची उपस्थिती होती.
Rokhthok News