● कंपनी व्यवस्थापनाची मनमाणी
MNS NEWS WANI | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कोलारपिंपरी येथील हिलटॉप हायराईन या माती कंपनीच्या नियमबाहय वर्तन व मनमाणी कारभारामुळे राडा केला तर एका कर्मचाऱ्यांला मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शनिवारी प्रकल्प व्यवस्थापक यांचे तक्रारीवरून तीन मनसे पदाधिकाऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. Cases under various sections have been registered against three MNS activists
फाल्गुन गोहोकार (40) रा. वणी, प्रवीण मांडवकर (30) रा. पिंपरी, सूरज लोंढे (30) रा. पिपरी असे गुन्हे नोंद झालेल्या मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नांवे आहे. दिनांक 15 मार्च ला सायंकाळी तालुकाघ्यक्ष फाल्गुन गोहोकार व कार्यकर्ते कोलारपिंपरी येथील हिलटॉप हायराईन प्रा. लि. या कंपनीच्या कार्यालयात गेले. कंपनीतील अवजड वाहनाच्या अवागमनामुळे होत असलेल्या प्रदुषणाबाबत व्यवस्थापनाला जाब विचारला.
याप्रसंगी कंपनीतील कर्मचारी व मनसे कार्यकर्त्यांत शाब्दीक वाद उत्पन्न झाला. वादाचे रुपांतर आक्रमकतेकडे गेल्याने मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली तर वाहन चालकाच्या कानशिलात हाणली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर जाऊन या कंपनीच्या ट्रकची वाहतूक दोन ते अडीच तास रोखून धरली. त्यामुळे तणावात चांगलीच भर पडली.
या प्रकरणी प्रकल्प व्यवस्थापक उदयकुमार वीरेंद्रकुमार सिंग यांनी शनिवारी वणी पोलीस ठाणे गाठुन रितसर तक्रार दाखल केली आहे. वाहतुक अडवून धरल्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला, असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. कपंनी व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीं विरुद्ध भादंवि कलम 341, 323, 447, 427, 504, 506,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Rokhthok News