Home Breaking News कोमटी समाजाचा “ओबीसी” मध्ये समावेश करण्याचा “डाव”

कोमटी समाजाचा “ओबीसी” मध्ये समावेश करण्याचा “डाव”

● नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आले सर्वेक्षण

694
C1 20240318 15105290

नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आले सर्वेक्षण

Wani News : “मराठा” समाजानंतर आता “कोमटी” समाजाचा “ओबीसी” मध्ये समावेश करण्याचा सरकारचा डाव दिसून येत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ या तीन जिल्ह्यांत सर्वेक्षण करून कोमटी समाजाचा डेटा गोळा केला आहे. जर त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करून ओबीसी मधून आरक्षण दिल्यास मूळ ओबीसी खपवून घेणार नाही. याप्रकरणी जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी, मारेगाव, झरी च्‍या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्‍यमंञी यांना निवेदन दिले आहे. Government’s attempt to include “Komti” community in “OBC”.

जातनिहाय जनगणना न करता छुप्या मार्गाने “मराठा” समाजानंतर आता “कोमटी” समाजाचा “ओबीसी” मध्ये समावेश करण्याचा सरकारचा डाव दिसून येत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने पूर्व विदर्भातील नागपूर,  चंद्रपूर व यवतमाळ या तीन जिल्ह्यांत सर्वेक्षण करून कोमटी समाजाचा डेटा गोळा केला आहे. कोमटी समाजाची विशेष मागणी नसताना आणि ते कधीही रस्त्यावर उतरताना न दिसताही सरकार ओबीसींच्या हक्कांवर गदा आणण्याचे काम करत आहेत.

केंद्र व राज्य सरकारमध्ये 60 टक्‍के असलेल्या ओबीसी(VJ, NT, SBC) समाजाला तुटपुंजे म्हणजे फक्त 27 टक्‍के आरक्षण आहे. सरकारने त्यातही असंविधानिक असलेली नॉनक्रिमिलेअरची मर्यादा घालून अगोदरच ओबीसी(VJ, NT, SBC) समाजावर आरक्षण देताना अन्याय केलेला आहेत. “सरकारने ओबीसी(VJ, NT, SBC) सह सर्व जातीची जातनिहाय जनगणना करून  देशातील सर्व जातींची लोकसंख्या निश्चित करावी आणि लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनातुन करण्‍यात आलेली आहे.

कोमटी समाजाची शेकडो वर्षांपासून व्यापारी वर्गामध्ये गणना केली जाते. भारतीय समाज हा ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चातुवर्णात विभागल्या गेला होता. चातुवर्ण व्यवस्थेमध्ये “कोमटी” हा समाज “वैश्य” या वर्णात येतो, त्यामुळे  “कोमटी समाज” सामाजिक दृष्ट्या मागास ठरत नसून तो उच्च वर्णात येतो. कोमटी समाजातील लोक “सावकार” असून सावकारी व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी-कष्टकरी समाजाचे आर्थिक शोषण करून आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेले असल्‍याचा आरोप सुध्‍दा करण्‍यात आला आहे.

सरकारने कोमटी समाजाचा ओबीसींमध्ये कुठल्याही परिस्थितीत समावेश करून ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातुन देण्‍यात आला आहे. याप्रसंगी प्रदिप बोनगीरवार, मोहन हरडे, प्रा.धनंजय आंबटकर, गजानन चंदावार, अशोक चौधरी, आनंद घोटेकर, राकेश बरशेट्टीवार, सुरेश राजूरकर, बाळाजी वैद्य, प्रभाकर मोहितकर, नामदेवराव जेनेकर, रामजी महाकूलकर, साईकिरण अंदलवार, अशोक गौरकर, विलास देठे,  पांडुरंग पंडिले साहेब, राजू पिंपळकर,  संदिप माटे,  प्रवीण महाकुलकर, प्रफुल उरकुडे, शामराव घुमे, सुरेश मांडवकर आणि गजेंद्र भोयर यांची उपस्थिती होती.
Rokhthok News