● महायुती अद्याप उमेदवारांच्या शोधात
● Sunil Patil ● Political News | यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघ शिवसेना उबाठा गटाने प्रतिष्ठेचा केलेला आहे. महाविकास आघाडीने अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नसली तरी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संजय उत्तमराव देशमुख यांना निवडणुक रिंगणात उतरविण्याचे निश्चित केले आहे. यामुळे देशमुखांनी संपुर्ण मतदारसंघ पालथा घातला असुन प्रचारात आघाडी घेतली आहे. Party chief Uddhav Thackeray has decided to field Sanjay Uttamrao Deshmukh in the loksbha election.
यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ, दारव्हा – दिग्रस, राळेगांव व पुसद असे यवतमाळ जिल्ह्यातील चार तर वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा असे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. या लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचे कायम प्राबल्य राहिले आहे.
शिवसेना दुभंगल्या नंतर अनेक खासदार व आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. पंचवीस वर्ष खासदारकी उपभोगणाऱ्या भावना गवळी यांचा सुध्दा यात समावेश होता. नेते गेले माञ शिवसैनिक “जैसे थे” असल्याचे चिञ पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या झंझावती दौऱ्यात उघड झाले आहे. उध्दव ठाकरे यांचे बाबत ठिक ठिकाणी प्रचंड सहानुभूती बघायला मिळत आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी प्रचारात आघाडी घेतलेली असतांना महायुतीला अद्याप उमेदवारच गवसलेला नाही. भावना गवळी, संजय राठोड, मोहिनी इंद्रनिल नाईक, शितल संजय राठोड तसेच भाजपाचे राजु राजे पाटील यांची नावे चर्चेत आहेत. महायुती ऐनवेळी कोणता उमेदवार निवडणुक रिंगणात उतरविणार हे दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.
Rokhthok News