Home Breaking News शिवतीर्थावर शिवजयंतीची जय्यत तयारी

शिवतीर्थावर शिवजयंतीची जय्यत तयारी

● आकर्षक गडकिल्ल्यांचा देखावा ● मनसेच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सव

1301
C1 20240326 18194382

आकर्षक गडकिल्ल्यांचा देखावा
मनसेच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सव

रोखठोक | जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती दि. 28 मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने साजरी करण्यात येत आहे. संपूर्ण दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यालगत आकर्षक गडकिल्ल्यांचा देखावा साकारण्यात येणार आहे. On Shivtirtha, the scene of attractive forts will be created next to the equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj.

C1 20240326 18191301
शिवजयंतीची भव्य तयारी

मनसे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून आकर्षक गडकिल्ल्यांचा देखावा साकारण्यात येत आहे. अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात येते. ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी विशेष आकर्षण असले तरी विविध कार्यक्रमांची मेजवानी वणीकर नागरिकांना अनुभवता येणार आहे.

शिवजयंतीचा (Shiv Jayanti) सोहळा हा प्रत्येक शिवभक्तासाठी खास असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्म फाल्गुन कृष्ण तृतीया दिवशीचा असल्याने यावर्षी तिथीनुसार शिवजयंतीचा सोहळा 28 मार्चला साजरा केला जाणार आहे.
वणी : बातमीदार