Home Breaking News राजेश पुण्यानी यांचे अपघाती निधन

राजेश पुण्यानी यांचे अपघाती निधन

● अज्ञात वाहनाने दिली धडक

3330
C1 20240329 09550166

अज्ञात वाहनाने दिली धडक

Sad News : पतसंस्थेची दैनंदिन निधी जमा करणाऱ्या 53 वर्षीय अभिकर्त्याचे अपघाती निधन झाले. त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. ही घटना यवतमाळ मार्गावर मांगरुळ गावाजवळ गुरुवारी रात्री घडली. Accidental death of Rajesh Punyani

राजेश नरसिंग पुण्यानी (53) असे मृतकाचे नाव आहे. ते शहरातील विविध मल्टीस्टेट बँक, पतसंस्थाची दैनंदिन निधी गोळा करण्यासाठी अभिकर्ता म्हणून काम करीत होते. नेहमी प्रमाणे त्यांनी राजूर येथील खातेदारांची रक्कम संकलीत करून मारेगाव कडे जात असताना मांगरुळ जवळ ही दुर्दैवी घटना घडली.

दुचाकीवरून जात असताना राजेश याला फोन आला, त्यांनी बाजूला दुचाकी उभी केली. त्याच वेळी भरधाव येणाऱ्या वाहनाने धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या राजेशला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने नागपूर ला रवाना करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजेशच्या अपघाती मृत्यूने परिवार व मित्र मंडळींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजेशच्या पाश्चात पत्नी ,दोन मुले,भाऊ असा मोठा आप्तपरिवार आहे.
        (रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)