Home Breaking News कोळशाला लागलेली आग संशयास्‍पद, प्रशासन निद्रावस्‍थेत

कोळशाला लागलेली आग संशयास्‍पद, प्रशासन निद्रावस्‍थेत

● तीन दिवसांपासून धगधगतेय कोळसा ● प्रदुषण वाढले, विज तारां जळाल्‍या

876
C1 20240330 15084639

 तीन दिवसांपासून धगधगतेय कोळसा
 प्रदुषण वाढले, विज तारां जळाल्‍या

Wani News | लालपुलीया परिसरातील (FCI) एफसीआयच्‍या कोलडेपोतील कोळशाला तीन दिवसांपुर्वी आग लागली. यात दहा हजार टनाच्‍या आसपास कोळसा जळून खाक झाला, अजूनही आग धगधगतेय. यामुळे परिसरात प्रदुषण वाढले आहे तर लगतच्‍या विजतारा जळाल्‍याने परिसरात विज संकट उभे ठाकले आहे. कोलडेपोत मोठया प्रमाणात करण्‍यात आलेला कोळशाचा साठा आणि कोळशाला लागलेली आग संशयास्‍पद असुन, प्रशासन माञ निद्रावस्‍थेत आहे. Around 10,000 tons of coal was burnt, the fire is still burning.

C1 20240330 15140410

उन्‍हाळयाच्‍या दिवसात कोळशाला लवकरच आग लागते, ते ज्‍वलनशिल असल्‍याने कोलडेपो धारकाला सातत्‍याने दक्ष रहावे लागते. त्‍याप्रमाणेच आगीवर नियंञण मिळविण्‍याकरीता कोलडेपो मध्‍ये सर्व सोयीसुविधा असणे गरजेचे आहे. जवळच पेट्रोलपंप असल्यामुळे कोळसा वखारधारकांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कोळशाला लागलेली आग आटोक्‍यात येत नसेल तर अग्‍नीशमन यंञणेला पाचारण करुन संपुर्ण आगीवर नियंञण मिळवणे जिकरीचे आहे. माञ तीन दिवसांपासुन धुमसत असलेली आग आटोक्‍यात आणण्‍याची खबरदारी कोलडेपो धारकांनी घेतल्‍याचे सकृतदर्शनी दिसत नसल्‍याने ती लागलेली आग संशय निर्माण करणारी आहे.

एफसीआय (फ्युल कॉर्पोरेशन इंडिया लि.) च्या कोळसा डेपो मध्‍ये अंदाजे चाळीस हजार टन कोळशाची साठवणुक करण्‍यात आली आहे. सदर कोळसा गुजरात येथील कंपनीला “डिस्‍पॅच” करण्‍यात येत आहे. दररोज केवळ हजार टन कोळसाचे डिस्‍पॅच होत असल्‍याचे कळते. सहा ते सात रॅक कोळशाची साठवणुक नेमकी कशाकरीता करण्यात आली हे कळायला मार्ग नाही.

महसूल प्रशासन व PCB कुंभकर्णी झोपेत 
प्रदूषणाचे माहेरघर असलेल्या वणी परिसरात थाटण्यात आलेल्या कोल डेपोमुळे प्रदुषणाचा भस्‍मासुर वाढतांना दिसत आहे. त्‍यातच कोळशाला लागलेल्‍या आगीमुळे वातावरणांत चांगलेच प्रदुषण पसरले आहे. महसुल आणि प्रदुषण नियंञण मंडळाची डोळेझाक यासर्व बाबीला कारणीभूत ठरताहेत. तर मोठया प्रमाणात कोळसा साठवणुकीची परवानगी कोणी दिली हे तपासणे गरजेचे असुन नियमबाह्य वर्तन करणाऱ्या कोलडेपोवर तात्‍काळ कारवाई अपेक्षीत आहे.
Rokhthok News