● पार्श्वभूमी लोकसभा निवडणुकीची
सुनील पाटील-वणी | लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम धडाक्यात सुरु झाली आहे. उमेदवार मित्रपक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठी घेताहेत. महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी अचानक मनसे नेते राजू उंबरकर यांचे निवासस्थान गाठले. दोन्ही दिग्गजांच्या भेटीने राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले. याप्रसंगी नेमकं घडलंय काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. Mahayuti candidate Sudhir Mungantiwar suddenly reached MNS leader Raju Umbarkar’s residence on Wednesday.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चांगले वलय आहे. कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा असून तरुणाईला मनसेने भुरळ पाडली आहे. वणी विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चांगलाच जनाधार आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मनसेच्या मतांचा फायदा व्हावा याकरिता ही भेट घेतल्याचे बोलल्या जात आहे.
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरात चालू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका अद्यापही स्पष्ट न केल्याने मनसे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी भाजप पक्ष श्रेष्ठींची भेटीसाठी घेतल्या नंतर या निवडणुकीत मनसेचे इंजीन कमळाशी जोडली जाईल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चंद्रपूर लोकसभा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेचे विदर्भातील बडे नेते राजु उंबरकर यांची मनसे कार्यालयात भेट घेतली. चंद्रपूर लोकसभेत नव्या समीकरणाची जुळवा जुळव राजकीय पक्ष करताहेत. चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्रात मनसेचे चांगले प्राबल्य आहे. याचा प्रत्यय अनेक निवडणुकांमधून आला आहे.
मागील निवडणुकीमध्ये मनसेने काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना पाठिंबा दिला होता. त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे. आता या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसे भाजपच्या दिमतीला असल्यास या क्षेत्रात महायुतीला मनसेचा मोठा फायदा होऊ शकतो असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Rokhthok News