Home Breaking News काँग्रेस विरोधात फडणवीसांची फटकेबाजी

काँग्रेस विरोधात फडणवीसांची फटकेबाजी

● वणीत भाजपाची प्रचार सभा

561
C1 20240414 21493263
C1 20241123 15111901

वणीत भाजपाची प्रचार सभा

Political News | दहा वर्षात नरेंद्र मोदींनी देशात विकासाचा झंझावात सुरू केला. एनडीए कडे एक शक्तिशाली इंजिन आहे. काँग्रेस 26 इंजिन घेऊन निघाले आहे मात्र त्यातील डब्बे फेल आहे. असे म्हणत काँग्रेस विरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच फटकेबाजी केली. ते चंद्रपूर- वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ वणीत आयोजित जाहीर सभेत बोलत होते. In ten years, Narendra Modi started the development drive in the country.

शहरातील शासकीय मैदानावर आयोजित सभेत प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. अशोक उईके, आ. डॉ. संदीप धुर्वे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शिवसेनेचे विनोद मोहितकर, आरपीआई आठवले गटाचे वसुकेत पाटील, अलका आत्राम, विजय चोरडिया, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, जीवन पाटील, डॉ. मंगेश गुलवाडे, गजानन विधाते, सतीश नाकले व्यासपीठावर उपस्थित होते.

बोलतांना पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरीबी रेषेच्यावर आणले. 20 कोटी लोकांना घरे उपलब्ध करून दिलीत. 11 कोटी लोकांच्या घरी स्वच्छता गृह निर्माण करून दिली. बचत गटांना 8 लाख कोटी रुपये उपलब्ध करून दिले. मुद्रा लोन योजनेअंतर्गत कोट्यवधी लोकांना स्वतःच्या पायावर उभे केले. देशाला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण केल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन संजय पिंपळशेडे तर आभार रवी बेलूरकर यांनी मानले.

मनसे नेते राजू उंबरकर यांनी देशाच्या व या भागाचा विकासासाठी कोणतीही जात- पात न पाहता उमेदवाराचे कर्तृत्व पाहून सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवडून देणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. तर यावेळी जनसमुदायला संबोधताना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी ही देशाची निवडणूक आहे. प्रधानमंत्र्याचे हात बळकट करण्यासाठी सुधीरभाऊंना निवडून देण्याचे आवाहन केले.

काँगेसमुळे देश रसातळाला गेला
आयोजित प्रचार सभेत बोलतांना चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यावर सडकून टिका केली. काँग्रेसच्या कार्यकाळात देश रसातळाला गेल्याचा आरोप त्यांनी केला. सोबतच मागील चार वर्षात लोकसभा क्षेत्रात निवडून आलेल्यांचा विकास झाला की त्यांच्या नातेवाईकांचा असा टोला ही त्यांनी हाणला.
Rokhthok News