Home Breaking News सर्पदंश….चिमुकल्या बालिकेचा मृत्‍यू

सर्पदंश….चिमुकल्या बालिकेचा मृत्‍यू

● मारेगांव तालुक्‍यातील घटना ● गावात पसरली शोककळा

1696
C1 20240430 11572833

मारेगांव तालुक्‍यातील घटना
गावात पसरली शोककळा

Sad News | अवघ्‍या 14 महिन्‍याच्‍या लहानग्‍या बालिकेला विषारी सापाने दंश केला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असतांनाच तिचा वाटेतच मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवार दिनांक 30 एप्रीलला मध्‍यराञी दोन वाजताच्‍या दरम्‍यान घडली. यामुळे गावात कमालीची शोककळा पसरली आहे. A 14-month-old girl was bitten by a poisonous snake.

काव्या वैभव खेवले असे मृतक बालिकेचे नांव आहे. घटनेच्‍या दिवशी ती आई पल्‍लवीच्‍या कुशीत गाढ झोपेत होती. अशातच मध्यरात्री 2 वाजताच्‍या दरम्‍यान विषारी मन्‍यार जातीच्‍या सापाने घरात प्रवेश केला. खाली झोपलेल्‍या मायलेकीच्‍या अंथरुणात साप शिरला आणि क्षणात त्‍याने वैभवीच्‍या पायाला चावा घेतला. यामुळे ती बालिका रडायला लागली, आई पल्‍लवी लगेचच खडबडून जागी झाली आणि तीला समोरच तीन फुटाचा मन्‍यार जातीचा साप निदर्शनांस आला.

पल्‍लवीने  आरडाओरडा केला असता शेजारी जमा झाले. काहींनी सापाला पकडले तर बालिकेला तातडीने उपचारार्थ हलविण्‍यात आले. वाटेतच बालिकेचा मृत्‍यू झाला, या दुर्दैवी घटनेने गावात कमालीची शोककळा पसरली आहे.
Rokhthok News

Previous articleदुचाकीची जबर धडक, महिला ठार
Next articleकोण उधळणार विजयाचा गुलाल…!
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.