● पक्षांतर्गत कुरघोडीचा परिपाक
Political news | सहकार क्षेत्रात महत्वाची समजल्या जाणाऱ्या वसंत जिनिंग अँड प्रेसिंग चे विद्यमान अघ्यक्ष आशिष खुळसंगे यांचेवर अविश्वासाचे सावट घोंगावत आहे. बहुतांश सदस्य कॉग्रेस पक्षाचे असतांना पक्षांतर्गत विरोधकांनी एकञीत मोट बांधुन 13 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या या अविश्वासाच्या ठरावा करीता घेतल्याची विश्वसनिय माहीती आहे. It is reliable information that signatures of 13 members have been taken for this no-confidence motion.
वसंत जिनिंग अँड प्रेसिंग ची निवडणूक अटीतटीची झाली होती. तिहेरी झालेल्या या लढतीत माजी आमदार वामनराव कासावर यांच्या परिवर्तन पँनलने शेवटच्या क्षणी बाजी मारली आणि 17 पैकी 15 उमेदवार निवडून आणत आपले वर्चस्व सिध्द केले होते. अध्यक्षपदाकरीता संजय खाडे, प्रमोद वासेकर आणि पुरुषोत्तम आवारी यांचे नावाची चर्चा सुरु असतांना अनपेक्षीतपणे कासावारांनी आशिष खुळसंगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.
वसंत जिनिंग अँड प्रेसिंगच्या अध्यक्षांवर अविश्वास येणार असल्यांच्या चर्चा मागील दोन महिन्या पासुन रंगत आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीमुळे अविश्वासाची हवा विरली की काय असे वाटत असतांनाच पुन्हा चर्चा रंगायला लागल्या आहेत.अविश्वास ठराव पारित करण्यासाठी 12 सदस्यांची गरज असते मात्र पक्षांतर्गत विरोधी गटाने 13 सदस्यांची एकञीत मोट बांधली असल्याची माहिती असुन अध्यक्षांवर अविश्वास आणायचाच असा निश्चय केलाचे सुञांने सांगीतले आहे.
● विरोधी पक्षाची फूस तर नाही ना..! ●
वसंत जिनिंग अँड प्रेसिंग मधील सर्वच सदस्य कॉग्रेस पक्षाचे आहेत. माजी आमदार वामनराव कासावार यांचे नेतृत्वात योग्य पघ्दतीने कामकाज सुरु आहे. भावी खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सुध्दा पाठींबा असणारच आहे. कोणतीही नाराजी नसतांना पक्षातील काही विरोधक अविश्वासाचा ठराव घेत असतील तर त्यांना नक्कीच विरोधी पक्षाची फूस तर नाही ना..! हे तपासावे लागणार आहे.
आशिष खुळसंगे
अध्यक्ष,
वसंत जिनिंग अँड प्रेसिंग, वणी
Rokhthok News