● संजय खाडे यांनी दिला निर्वाणीचा ईशारा
Wani News | वेकोलिने डम्पिंग (मातीचा भराव) टाकल्यामुळे उकणी-वणी हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे वेकोलिने दुसरा पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम सुरु केले मात्र हे काम संथगतीने सुरु आहे. त्याचा फटका उकणीवासीयांना बसणार असुन पावसाळयापुर्वी रस्त्याचे बांधकाम करावे अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेवून तिव्र आंदोलन छेडावे लागेल असा निर्वाणीचा ईशारा कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी वेकोलीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. The Ukani-Vani route has been closed due to dumping (soil fill) by WCL.
उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचतो आणि रस्ता बंद होतो. त्यामुळे उकणीवासीयांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी दिनांक 11 मे रोजी कापूस पणन संजय खाडे यांनी ग्रामस्थांसह वेकोलि अधिका-यांची भेट घेत चर्चा केली.
● वेळेत काम पूर्ण न केल्यास आंदोलन ●
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाला सुरुवात होते. रस्त्याचे काम संथ गतीने सुरु असल्याने हे काम येत्या एक महिन्यात पूर्ण होणे अशक्य वाटत आहे. उकणी येथील रहिवासी नेहमीच शिक्षण, काम, नोकरी, व्यवसाय यासाठी वणीला येतात. वेकोलिने वेळेत पक्का रस्ता बनवून दिला नाही तर वेकोलिविरोधात गावक-यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन उभारले जाईल.
संजय खाडे, संचालक कापूस पणन महासंघ
निवेदन देते वेळी, प्रा. शंकर व-हाटे, पुरुषोत्तम आवारी, संदीप कांबळे, बंडू खिरटकर, राजू चिंचोलकर, रोशन देरकर, जीवन मजगवळी, किसन पारशिवे, मनोज खाडे, निलेश हिरादेवे, स्वप्नील गोवारदिपे, अजय खाडे यांच्यासह उकणी येथील रहिवासी उपस्थित होते.
Rokhthok News